पंढरपुरात आज विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. भाविकांना दर्शन देण्यासाठी उभ्या असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवठा प्रक्षाळपूजेद्वारे काढला जातो अशी भाविकांची श्रद्धा आहे. कार्तिकी यात्रेनंतर प्रक्षाळ पूजा केली जाते. विठ्ठलाच्या मूर्तीला गरम पाणी आणि दही दुधाने स्नान घालण्यात आले. आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाची नित्योपचार पूजाही करण्यात आली. प्रक्षाळ पूजा करण्यासाठी पुणे येथील बाळासाहेब शेरे आणि सहकाऱ्यांनी श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या मंदिराच्या गर्भगृहास फळांची आणि फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

कार्तिकीची यात्रेदरम्यान विठ्ठल आणि रुक्मिणी यांची नित्योपचार बंद करण्यात आले होती. ते आता पूर्ववत करण्यात आले. दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर चोळून दर्शन घेत होते. असे केल्याने देवाच्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे. यानंतर देवाला सुंदर पोशाख परिधान करण्यात आला. तसेच हिरे-माणिकांच्या दागिन्यांनी सजविण्यात आले.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
kolhapur, mahalaxmi mandir, mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मी देवी मूर्ती संवर्धनास स्थगिती देण्यात यावी, जबाबदारी निश्‍चित करा; महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा

रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते.देवाचा शिणवटा घालवण्यासाठी रात्री गवती चहासह विविध प्रकारचे १५ ते १६ आयुर्वेदिक पदार्थांचा काढा झोपण्यापूर्वी दिला जातो. या काढ्यामुळे देवाला पूर्ण विश्रांती मिळून चांगली झोप लागते असे मानतात. पुण्यातील बाळासाहेब शेरे आणि सहकार्याने श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे गर्भगृह आणि मंदिरास विविध फळ आणि आकर्षक फुलांची आरास करण्यात आली.