News Flash

पंढरपूर : आजपासून विठ्ठल मंदिरात मोबाईलला नो एन्ट्री

नववर्षाच्या सुरूवातीला मंदिरात फुलांचा नवा साज

नवीन वर्षाची सुरवात परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्श दर्शनाने व्हावे यासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने नववर्षाच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात ब्यू डायमंड नावाच्या फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे...

नवीन वर्षाची सुरवात परमात्मा पांडुरंगाच्या पदस्पर्श दर्शनाने व्हावे यासाठी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. नवीन वर्षाची सुरवात म्हणून मंदिर समितीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभार्यात आकर्षक अशा ब्ल्यू डायमंड नावाच्या फुलांनी आरास केली आहे. या फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून आले आहे. दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने एक जानेवारी पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निणर्य घेतला आहे. या करीता समितीने स्वतंत्र लॉकरची व्यव्यस्था केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठ्ल जोशी यांनी दिली आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता पर्यटनस्थ ऐवजी तीर्थक्षेत्र या ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे. पंढरपूर येथे या वर्षी देखील भाविकांची गर्दी दिसून आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदिर समितीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली. ब्ल्यू डायमंड या फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा,सोळखांबी,प्रवेशद्वार आदी ठिकाणी आकर्षक फुलांनी सजविले आहे. या फुलांच्या आरासित देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

दरम्यान ,मंदिर समितीने एक जानेवारी पासून मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मंदिरात आल्यावर भाविक देवाचे,मंदिरात फोटो काढणे,मोबैल्व्र बोलणे या सारखे प्रक्रार होऊ लागले. यामुळे आजपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे ६०० लॉकरची व्यवस्था केली आहे. यासठी नाममात्र दोन रुपये आकारले जाणार आहेत.तसेच काही भाविकांचा मोबाईल नजरचुकीने बरोबर आला तर मंदिरात प्रवेश करतात त्या ठिकाणी २५० लॉकरची व्यवस्था केली आहे. येणार्या भाविकांनी समितीला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे. याही उपर जर कोणी मोबाईल आणला तर काय्देहीर कारवाई केली जाईल असे मंदिर समितीने सांगितले आहे. एकंदरीत नवीन वर्षाच्या सुरवातीलाच पांढरी नगरी भाविकांनी फुलून गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 10:28 am

Web Title: pandharpur vitthal madir blue dimand flower mobile not allowed in mandir nck 90
Next Stories
1 काय आहे भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास?
2 २०० उमेदवार रिंगणात
3 तारापूर औद्योगिक वसाहतीत प्रदूषणमुक्तीकडे पहिले पाऊल
Just Now!
X