फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याच्या आमराईमधे शनिवारी वैष्णवांचा अधिपती असलेला सावळा विठूराया आणि रुक्मिणीमाता सजलेले दिसून आले. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शनिवारी विठ्ठल आणि रूक्मिणीमातेच्या गर्भगृहास ११ हजार आंब्याची आरास करण्यात आली. पुण्यातील विनायक काची या आंबा व्यापाऱ्याने ही सेवा विठ्ठल चरणी अर्पण केली.

सध्या उन्हाळ्यामुळे सर्वत्र आंब्याची आवक वाढत आहे. यातच झोपडीपासून बंगल्यापर्यत आंब्याची रेलचेल आहे. पंढरीचा सावळा विठुराया देखील आंब्यामधे सजलेला दिसून येत आहे. यंदा प्रथमच विठोबास आंब्यानी सजविण्यात आलेले आहे. यासाठी तब्बल ११ हजार रत्नागिरी हापूस आंबा वापरण्यात आलेला आहे.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार

विशेष म्हणजे सदरच्या आंब्याची आरास करण्यासाठी १०० विठ्ठलभक्तांनी शुक्रवारी रात्री कष्ट घेतले. आंब्यासह आंब्याची पाने देखिल यावेळी आरास म्हणून वापरण्यात आलेली आहे. विठोबाची सोळखांबीसह संपूर्ण गर्भगृह तसेच रूक्मिणीमातेचे गर्भगृह , राधिका , सत्यभामा , व्यंकटेश , महालक्ष्मी आदि मंदिराना देखिल आंब्याची तोरणे करून आरास करण्यात आलेली आहे.

पुणे येथील विनायक काची या आंबा व्यापाराने सदरचे आंबे हे विठ्ठलचरणी अर्पण केले आहे. यांचा नैवैद्यही दाखवण्यात आलेला आहे. या आंब्याची किंमत साधारणपणे ४ लाख ५० हजारांच्या आसपास आहे. हे आंबे पुढील तीन ते चार दिवस मंदिराच्या अन्नछत्रामधे भाविकांना आमरसाच्या रूपाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

यापूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले तसेच व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या संकल्पनेतून मंदिरास फुलांची आरास केली जात होती. मात्र यंदा प्रथमच आंब्याची आरास करण्यात आली.