22 October 2020

News Flash

विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, समिती सदस्याने शिवीगाळ केल्याचा आरोप

वारी काळात व्हीआयपी दर्शन बंद आहे. पण आपण आणलेल्या भाविकांना आत सोडावे अशी आग्रही मागणी या सदस्याने केली होती.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन वारीच्या काळात मंदिरात गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारी काळात व्हीआयपी दर्शन बंद आहे. पण आपण आणलेल्या भाविकांना आत सोडावे अशी आग्रही मागणी या सदस्याने केली होती. त्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने संबंधित समिती सदस्याने शिवीगाळ केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. कर्मचाऱ्यांनी आज (गुरूवार) सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

अधिक माहिती अशी, मंदिर समितीच्या एका सदस्याने समितीच्याच कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या सदस्याने आणलेले लोक दर्शनास सोडण्यास समितीच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यामुळे चिडलेल्या सदस्याने समितीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. येथे बसू नका, मंदिराच्या बाहेर निघून जा असा दम देत गोंधळ घातल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. सर्व कर्मचारी मंदिरातील सभा मंडपात एकत्र आले आणि संबंधीत सदस्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 12:33 pm

Web Title: pandharpur wari vitthal rukhmini mandir samiti staff started protest of no work against mandir samiti member
Next Stories
1 बाकीचे नालायक ठरल्याशिवाय मनसेची आठवण येत नाही: राज ठाकरे
2 बोनस दिला जातो मग शेतकऱ्यांना अनुदान का नाही ? : राजू शेट्टी
3 दूध कोंडी आंदोलनाचा आज चौथा दिवस
Just Now!
X