पन्हाळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक अधिकार्‍यासह सर्व कर्मचारी बुधवारी  लाचलुचुपत पथकाच्या कारवाईत लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले.  संपूर्ण कार्यालयीत कर्मचारी वर्गावर अशी कारवाई झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

कणेरी पैकी धनगरवाडा (ता.पन्हाळा) येथील तानाजी रामू जानकर यांची जमिन  तक्रारदार अभिमन्यू पाटील खरेदी करणार होते. त्याकरता मंगळवारी   पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक अधिकारी यशवंत सदाशिव चव्हाण यांना भेटले. यावेळी  तक्रारदाराकडे  स्वत:सह  शिपाई अशा सर्वांसाठी ५ हजार  रुपये लाचेची मागणी केली.  त्यावर  अभिमन्यु पाटील यांनी येथील  लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालकडे तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार आज पन्हाळा येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उपधीक्षक प्रविण पाटील व सहकार्याच्या  पथकाने सापळा रचला. अभिमन्यु पाटील याने  शासकीय पंचाच्या साक्षीने आपला चार गुंठ्यांचा  दस्त नोंदणी केला. यानंतर दुय्यम निबंधक यशवंत चव्हाण एक हजार रुपये , लिपीक गिता बोटे,शिपाई प्रकाश सनगर,काँम्यपुटर आँपरेटर नितीन काटकर,सुशांत वणीरे व खाजगी उमेदवार शहाजी पाटील प्रत्येकी ५००  रुपये अशी या सर्वांनी मिळुन ३५००  रुपये लाच रक्कम स्वीकरताना रंगेहाथ सापडले. यानंतर या सर्व आरोपींना अटक करण्यात आली. अभिमन्यू पाटील हा नुकताच गाजलेल्या बांदिवडे खुन प्रकरणातुन निर्दोष सुटून  आलेला आहे. या खून प्रकरणावेळी त्याच्यावर दुय्यम निबंधक कार्यालयाकडून खोटे दस्त केले म्हणून फिर्याद दाखल झालेली असून त्याची चौकशी सुरु आहे. त्या रागापोटी त्याने ही तक्रार केली आहे अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.