News Flash

पाणीपुरीसाठी शौचालयाच्या टाकीतील पाण्याचा वापर, कोल्हापूरकरांनी फोडली गाडी

संतापलेल्या कोल्हापूरकरांनी केली पाणीपुरी गाडीची नासधूस

कोल्हापूरचा रंकाळा तलाव परिसर म्हणजे कोल्हापूरची शान. या ठिकाणी खाद्य पदार्थांच्या अनेक गाड्या, स्टॉल्स आहेत. मात्र यातल्या एका पाणीपुरीच्या गाडीवर सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतलं पाणी वापरलं जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. रंकाळा परिसरतात हा घाणेरडा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर अज्ञात तरुणांनी या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याची गाडीची नासधूस केली आहे. कोल्हापूर शहरातले एक महत्वाचे ठिकाण म्हणजे रंकाळा तलाव. या ठिकाणी असलेल्या एका पाणीपुरीच्या गाडीवर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देशात, राज्यात करोनाचा कहर सुरु आहे. या संकटकाळात हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. हा पाणीपुरी विक्रेता शौचालयाच्या टाकीतलं पाणी भरुन आणून पाणीपुरीसाठी वापरत होता. एवढंच नाही तर हेच पाणी ग्राहकांना पिण्यासाठीही ठेवण्यात येत होतं. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होताच कोल्हापूरकरांनी या पाणीपुरीवाल्याला कोल्हापुरी हिसका दाखवला आहे. त्याच्या गाडीवरचे पाणी संतापलेल्या लोकांनी रस्त्यावर फेकलं. टीव्ही ९ ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काय आहे व्हिडीओत?

रंकाळा तलावाच्या जवळच असलेल्या एका सार्वजनिक शौचालयाबाहेर असलेल्या नळातून पाणीपुरी विक्रेत्याचा सहकारी २० लिटर पाण्याची कॅन भरुन घेतो. ही कॅन स्कूटरवरुन घेऊन रंकाळा परिसरात असलेल्या पाणीपुरीच्या गाडीजवळ जातो. पाणीपुरीच्या पाण्यात काही पाणी मिसळतो आणि उरलेलं पाणी पिण्यासाठी ठेवतो.

कोल्हापुरात हा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यानंतर संतापलेल्या कोल्हापूरकरांनी या गाडीपाशी जाऊन तोडफोड करत आपला राग व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 3:06 pm

Web Title: panipuri vendor used government toilet tank water for making pani puri in kolhapur scj 81
Next Stories
1 …म्हणूनच उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी
2 आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ; धनंजय मुंडेंची माहिती
3 अर्णब गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला
Just Now!
X