मला कोणी विचारलं की तुम्हाला काय व्हायचंय तर सांगेल की लोकांच्या आठवणीतील मुंडे साहेब व्हायचंय हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असल्याची ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कबुली दिली आहे.स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड मध्ये त्या बोलत होत्या. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीना उजाळा दिला,यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,महापौर नितीन काळजे,उपमहापौर शैलजा मोरे,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक,खासदार अमर साबळे,आझम पानसरे,सचिन पटवर्धन,सदाशिव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विरोधक म्हणतात की पंकजा मुंडे ही रडून मते मागते,भावनिक राजकारण करते.भावनिक राजकारण करण्याचं मी मुंडे साहेबांकडून शिकले आहे.भावनिक राजकारण नसून ते भावनेने केलेलं राजकारण करत होते.साहेबांच्या आठवणी मित्रांना तर येतातच पण शत्रू सुद्धा त्यांना विसरू शकत नाही.ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांना मानणारा वर्ग असेल आणि निवडणूका असतील तर त्या ठिकाणी विरोधकांना सुद्धा मुंडे साहेबांच नाव घ्यावं लागतं अस म्हणत पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर निशाण साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की,कॉलेज जीवनात मुंडे साहेबांनी जनरल सेक्रेटरीची निवडणूक लढवली मात्र सतत तीन वर्षे ते एका मतांनी निवडणुकीत पराभूत झाले.आपण एका मतांवरून पराभूत का झालो.हे पाहिलं पाहिजे याच मतांवरून स्व.प्रमोद महाजन आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांची मैत्री झाली.आपणही काम केलं पाहिजे,युती केली पाहिजे.त्यावेळी ते जनरल सेक्रेटरीची निवडणूक जिंकले,तेव्हा पासून राजकारणाची स्वप्न पाहण्यास सुरुवात झाली.त्यावेळी भाजपचा जन्म पण झाला नव्हता.पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.मुंडेसाहेबांचा स्वभाव मनमिळावू होता.त्यांचं संयमी व्यक्ती महत्व होत.मात्र राजकारणात साहेबांचा राग कोणी अंगावर घेत नव्हतं.एवढी ताकत त्यांची होती.

२००९ मध्ये निवडणुकीत मला खूप काही शिकवलं,मी म्हणायचे मला एवढी मेहनत का करायला लावता.महाराष्ट्र फिर,आंदोलनात भाग घे,आधीवेशन बुडवला नाही पाहिजे.दुसऱ्याच वेगळं आहे.तुला माझी राहिलेली काम,स्वप्न पूर्ण करायची आहेत.असे मुंडे साहेब म्हणायचे.तर शेवटच्या तीन चार वर्ष्यात त्यांना कुठे तरी जाणवायचं बोलताना म्हणायचे की माझी ही शेवटची निवडणूक आहे.आता मी जगणार नाही.आता माझं फार आयुष्य नाही.बोलता बोलता ते म्हणायचे.त्यांचं जगणं राहून गेलं आणि थोडं थोडं करून माझ्यात टाकत गेले.आज मी ही उभी आहे अनेक वेळा मला भास होतो.मी नाही की मुंडे साहेब उभा आहेत.मी मुंडे साहेबांसारखी बोलते,वागते.लोकांच्या बोलण्यात चकाकी येते.ती चकाकी मला भास करून देते की मी मुंडे साहेबांसारखी वाटते.म्हणून मला कोणी विचारल की तुम्हाला काय व्हायचंय तर मी सांगेल लोकांच्या आठवणीतील मुंडे साहेब व्हायचंय हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असल्याची कबुली पंकजा मुंडे यांनी दिली.