‘वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येईल’ असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याला सुरूवात झाली. यावेळी आपल्या भाषणामध्ये पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली. लपून वार काय करता, समोरून वार करा असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी केला. तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार महामंडळ’ स्थापन करु अशी घोषणाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली आहे.  या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही पंकजा यांच्या हस्ते झाले. या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती.

पंकजा मुंडेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक
fire broke out in huts of sugarcane workers
शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख

उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार मंडळ’ जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही, हे माझं वचन आहे.

२०१४साली ९९ टँकर होते. पण, मी मंत्री झाल्यापासून चार वर्षात एकही टँकर लागला नाहीः पंकजा मुंडे</p>

बीडः भगवान बाबांचं मंदिर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगावात का उभं राहु नये?: पंकजा मुंडे

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी पंकजा मुंडे संघर्ष करत आहे: पंकजा मुंडे

तुमच्या हातातील कोयते खाली ठेवण्यासाठी पंकजा मुंडे काम करेल: पंकजा मुंडे

ऊसतोड कामगारांसाठी रानात कोयता घेऊन जाण्यासही तयार – पंकजा मुंडे

मी तुमच्यामुळे मंत्री झालेय – पंकजा मुंडे

महाराष्ट्रात २०१९ला भाजपाच्या विजयाचीच घंटा वाजणारः पंकजा मुंडे

पंकजा मुंडे आणि सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार नाहीः पंकजा मुंडे

माझ्या कारखान्याच्या शेतकऱ्यांना FRP साठी पैसे नव्हते, तेव्हा माझ्या आईने स्वत:ची जमीन गहाण ठेवून पैसे दिले : पंकजा मुंडे

तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं, पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही ,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

लपून वार काय करता, समोरून वार करा; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना टोला

मी कोणालाच घाबरत नाही – पंकजा मुंडे

मला कोणत्याही पदाची लालसा नाही – पंकजा मुंडे

मुंडे साहेबांच्या पश्चातही मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला – पंकजा मुंडे

मुंडेसाहेब किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे – पंकजा मुंडे

मुंडेंच्या निधनानंतर भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेऊ नये, तेथे राजकीय भाषण करू नये याला गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी बंदी घातल्याने तीन वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशीच पंकजा यांना मेळावा घ्यावा लागला होता. त्यानंतर सावरगाव येथील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मागील वर्षीपासून भगवानबाबांचे जन्मस्थळी सावरगावात दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील संघर्षांनंतर गेल्या वर्षी सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे स्थलांतरीत केलेल्या ‘दसरा’ मेळाव्याला यावेळी कसा प्रतिसाद मिळतो याची साऱ्यांनाच उत्सुकता होती.