बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीला इशारा देणारे टि्वट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्यातील शांतता आणि सुख कायम राहावं असं पालकत्व कोणाचं ही मिळावं मग ते कोणीही असो अशी भावना होती. पण सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ शकत नाही असं पंकजा मुंडे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना बेदम मारहाण केली. धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली म्हणून मारहाण केली असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde warn ncp workers in beed dmp
First published on: 22-01-2020 at 21:26 IST