25 January 2021

News Flash

पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

त्यांच्याबद्दलच्या अफवा थांबायला हव्यात !

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महिला-बाल कल्याण आणि ग्रामविकास खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी यावेळी बाजी मारत विधानसभेमध्ये आपलं स्थान पक्क केलं. हक्काच्या परळी मतदारसंघातून झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे पंकजा भाजपाला रामराम करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.

अवश्य वाचा – पंकजा मुंडे राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत?

अखेरीस भाजपाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रीया दिली आहे. “पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात”, चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची बाजू मांडली.

आणखी वाचा- पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?; भाजपाला बसणार हादरा

कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचं विश्लेषण करत असतो. असं का झालं याबद्दल तो आत्मचिंतन करत असतो. १२ तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी राज्यभरातील त्यांचे अनेक नेते गोपीनाथगडावर येतात. आम्हीही या कार्यक्रमाला जातो. त्यामुळे पंकजा वेगळा विचार करत आहेत असा अर्थ काढणं चुकीचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

अवश्य वाचा – परत आलो तर तुमच्यासकट येईन ! देवेंद्र फडणवीसांनी घेतली भुजबळांची फिरकी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 2:21 pm

Web Title: pankaja munde will not leave bjp says state bjp president chandrakant patil psd 91
Next Stories
1 खेळणीच्या दुकानाने जागा केला आमदारांतील ‘बाप’, रोहित पवारांची भावनिक पोस्ट
2 “फडणवीस यांनी खरोखर ४० हजार कोटींचा निधी परत केला असेल तर…”
3 मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टवर सावट, ठाकरे सरकार रोखणार बुलेट ट्रेन?
Just Now!
X