News Flash

..तर बीडमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त करू, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान

राष्ट्रवादीच्या सभेचा समारोप परळीत घ्यायला ही काय राजधानी आहे का? असेही पंकजा मुंडे यांनी विचालं

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप परळीमध्ये होतो आहे. याच संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर कडाडून टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा समारोप परळीमध्ये करत आहात? परळी काय राज्याची राजधानी आहे का? असं असेल तर बीडमध्ये यांचं डिपॉझिट जप्त करू असं आव्हान पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. धनंजय मुंडे यांचं नाव न घेता पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

महाराष्ट्रातून भाजपाचे सर्वाधिक खासदार निवडून द्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना झेंडा फडकवण्याचीही संधी मिळायला नको असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. निवडणुकीच्या विजयाचा खरा शिल्पकार भाजपाचा कार्यकर्ता असणार आहे त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून तयारीला लागा असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आपल्या देशात एक पक्ष आहे जो एका परिवाराचा पक्ष आहे. मात्र भाजपा हा पक्षच एक परिवार आहे. त्यामुळे आता मोठ्या विजयाचा पाया रचण्याची वेळ आली आहे असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप परळीमध्ये होतो आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. काही वेळापूर्वीच ते परळीत दाखलही झाले आहेत. आता सभेत पवार काय बोलणार याची उत्सुकता सगळ्या राज्यालाच आहे. असं असलं तरीही परळीत राष्ट्रवादी काँग्रेसने समारोप कार्यक्रम ठेवल्याने पंकजा मुंडे चिडलेल्या वाटल्या. त्याच त्वेषातून त्या भाषण करत असल्यांचही  दिसलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 5:04 pm

Web Title: pankja munde criticised dhanajay munde on parali ncp sabha
Next Stories
1 कुटुंबीयांना भेटण्यासाठी अरुण गवळीला हवी एक महिन्याची संचित रजा
2 मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही, मराठा समाजाचा निर्धार
3 कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका; मराठा क्रांती मोर्चा लोकसभेच्या रिंगणात
Just Now!
X