News Flash

भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

जाणून घ्या पंकजा मुंडे यांनी काय म्हटलं आहे

भाजपाने आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली आहे. याविषयीची जी पत्रकार परिषद होती त्यात चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. पंकजा मुंडे यांना केंद्रातली जबाबदारी दिली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. नवीन भाजपा महाराष्ट्र टीमचे अभिनंदन माझ्याविषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानते असा ट्विट पंकजा मुंडे यांनी केला आहे.

 

भाजपाच्या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने बऱ्याच उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. मात्र आता पंकजा मुंडे यांनीच याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नव्या कार्यकारिणीतल्या सदस्यांचे अभिनंदन केलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.

पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान नसलं तरीही केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल. भाजपाच्या नेत्या प्रीतम मुंडे आणि भाजपाच्या नेत्या रक्षा खडसे या दोघीही खासदार आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे असं मुळीच नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. दरम्यान माझ्याबद्दलची भूमिका चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते असंही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 8:19 pm

Web Title: pankja mundes first reaction about bjp new executives scj 81
Next Stories
1 पालिकेच्या करोना कक्षातील महिला अधिकारीच पॉझिटिव्ह
2 कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ४१ हजार गुन्हे दाखल-अनिल देशमुख
3 स्थलांतरित मजुरांचा महाराष्ट्राकडे पुन्हा ओघ सुरू; २५ जुलैपर्यंत अनेक गाड्या फूल
Just Now!
X