News Flash

जाळपोळ व पोलिसांवर दगडफेक: सरकार अस्तित्वात आहे का? : हायकोर्ट

दोन्ही हत्या प्रकरणांच्या तपासाविषयी असमाधानी असलेल्या दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली.

मुंबई हायकोर्ट

डॉ. नरेंद्र दाभोलकर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या आंदोलनातील हिंसाचाराबद्दलही नाराजी व्यक्त केली. राज्यातील सध्याची परिस्थिती फारच विदारक आहे. बसेस जाळल्या जातात, पोलिसांवर दगडफेक सुरु आहे. राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही ?, अशा शब्दात हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली.

दोन्ही हत्या प्रकरणांच्या तपासाविषयी असमाधानी असलेल्या दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, सीबीआय आणि विशेष तपास पथकाचा (एसआयटी) सीलबंद अहवाल सादर करण्यात आला. मात्र, हायकोर्टाने सीलबंद लिफाफ्यातील तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. ‘तपास यंत्रणांकडून वारंवार तोच अहवाल सादर केला जातो’, असे खडे बोल सुनावत हायकोर्टाने अहवाल स्वीकारण्यास नकार दिला.

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास कर्नाटकमधील विशेष तपास पथकाने वेगाने करत आरोपींना अटक केली. पानसरे- दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी यातून काही शिकावे, असे हायकोर्टाने सांगितले.
सध्या राज्यातील परिस्थिती विदारक दिसते. बसेस जाळल्या जातात, पोलिसांवर दगडफेक सुरुये, राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे की नाही ?, असे नमूद करत हायकोर्टाने मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 1:51 pm

Web Title: pansare dabholkar murder case bombay high court maratha protest slams state government
Next Stories
1 …म्हणून भक्तांनी विठ्ठल मंदिराची दोन ट्रक फुलांनी केली सजावट
2 धक्कादायक..! सांगलीत नवऱ्याला कारमध्ये डांबून गर्भवतीवर सामूहिक बलात्कार
3 शिवसेनेच्या ‘टक्केवारी’मुळे मराठी माणसाची अधोगती: नारायण राणे
Just Now!
X