शासनाने मंगळवारी पनवेल महापालिकेची अधिसूचना जारी केल्यानंतर त्यााचे अपेक्षित पडसाद बुधवारी झालेल्या रायगड जिल्हा व परिषदेच्या स्थायी समितीच्या बठकीत उमटले. उपाध्यपक्ष अरिवद म्हात्रे व महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांनी थेट विरोध दर्शवला तर समाविष्ट होणाऱ्या ग्रामपंचायती व स्थायी समितीची भूमिका शासनाने विचारात घ्यावी, अशी भूमिका घेत महापालिकेला पाठिंबा देणारा ठराव मंजूर करण्यात आला. पनवेल तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. त्या २३ पकी १२ ग्रामपंचायतींनी महापालिकेत सामील होण्यास विरोध दर्शवला आहे. १० ग्रामपंचायतीनी होकार दिला आहे . तर एका ग्रामपंचायतीने तटस्थ भूमिका घेतली आहे. २९ महसूली गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. याचा पनवेलच्या राजकारणावर
निश्चित परिणाम होणार असल्याने त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत उमटणार हे अपेक्षितच होते. शासनाने यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतींच्या मासिक सभा, ग्रामसभा तसेच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेचा संयुक्तिक अहवाल मागितला आहे. त्यावर आजच्या सभेत जोरदार चर्चा झाली.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरिवद म्हात्रे व महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रिया मुकादम यांनी या ठरावाला जोरदार विरोध केला. अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनीही विरोधात भूमिका मांडली. पनवेल महापालिकेत समाविष्ट
झालेल्या गावांमुळे जिल्हा परिषदेचा महसूल कमी होणार आहे. शासनाने या भागातील जिल्हा परिषदेच्या मालमत्तांबाबत कोणतीही भूमिका मांडलेली नाही. कुठलाही अभिप्राय विचारात न घेता घेतलेल्या या निर्णयाला ठाम विरोध दर्शवला. हा विरोध लक्षत घेवून महापालिकेत समाविष्ट गावांमधील मालमत्तांबाबत विचार करावा, तसेच वगळण्यात आलेली गावे महापालिकेत समाविष्ट करावीत. असा ठराव अखेर मंजूर करण्याचत आला.
शिक्षक मारहाणीचेही पडसाद
बुधवारी झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत कुसुंबळे आदिवासी वाडी शाळेवरील अपंग शिक्षक चंद्रशेखर म्हात्रे मारहाण प्रकरणाचे पडसाद उमटले. महेंद्र दळवी यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांना चांगलेच धारेवर धरले. शाळा डिजिटल करण्यास ग्रामपंचायत विरोध करते. तसेच ग्रामपंचायत सदस्य शिक्षकाला मारहाण करतो. याचा अर्थ काय. असा सवाल दळवी यांनी उपस्थित केला. बांधकाम सभापती चित्रा पाटील या बडेंच्या मदतीला धावल्या. तेव्हा महेंद्र दळवी आणि चित्रा पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 1:38 am