News Flash

आरोप खोडसाळ : देशमुख

वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सिंह यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते.

आरोप खोडसाळ : देशमुख
संग्रहित - ट्विटर

मुंबई : परमबीर सिंह यांनी के लेले आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे सिंह यांच्यापर्यंत पोहोचत असल्याच्या शक्यतेमुळे त्यांनी खोडसाळ आरोप के ल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. सिंह यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून आपला बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असे देशमुख म्हणाले. १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर सिंह यांनी १६ मार्चला सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांना व्हॉटसअ‍ॅपवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा सिंह यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सिंह यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. वॉट्सअ‍ॅपवरून उत्तरे मिळवताना सिंह किती अधीर झाले होते हे त्यांच्या संदेशांवरून लक्षात येईल. सिंह सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? वाझे यांनी जर फेब्रुवारीमध्ये सिंह यांना भेटून हे सर्व सांगितले असेल तर सिंह एवढे दिवस शांत का होते? असा सवाल गृहमंत्री देशमुख यांनी केला.

सिंह यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे मी स्पष्ट केल्यानंतर त्यांनी स्वत:ला वाचविण्याच्यादृष्टीने १९ मार्च रोजी पुन्हा व्हॉट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप  देशमुख यांनी के ला. वाझे आणि संजय पाटील हे सिंह यांच्या अत्यंत जवळचे आहेत हे  पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय सिंह यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला, असे देशमुख यांनी नमूद केले. सिंह यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून त्यांनी ते सिद्ध करावेत असे आव्हानही देशमुख यांनी दिले. आपण सिंह यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत असल्याचे देशमुख म्हणाले. स्फोटकांची मोटार उभी केल्याच्या प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर सिंह यांनी खोटे आरोप करून सरकारला ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही देशमुख यांनी के ला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 3:12 am

Web Title: parambir singh allegations home minister anil deshmukh industrialist mukesh ambani akp 94
Next Stories
1 १०वी १२ वीच्या लेखी परीक्षा त्याच शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात
2 राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा केंद्राकडून प्रयत्न -संजय राऊत
3 रायगड जिल्ह्यात आज गिधाडांची गणना
Just Now!
X