आसाराम लोमटे

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून अंतिम मतदार यादी पुरवणी, वगळणी व दुरुस्तीसह प्रसिद्ध करण्यात आली. शतकमहोत्सवी परंपरा असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक ही राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाची असून परभणी, हिंगोली या दोन्ही जिल्ह्य़ांतील मातब्बर पुढारी बँकेच्या संचालकपदी राहिले आहेत. आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडेच आलटून-पालटून बँकेची सूत्रे राहिली आहेत. या वेळीही दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी व्यूहरचना आतापासून आकाराला येत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वरपूडकर-बोर्डीकर यांच्यातील सत्तासंघर्ष पाहावयास मिळणार आहे.

Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट
giving tickets to ministers children relatives not dynastic politics siddaramaiah
काँग्रेसच्या उमेदवार याद्यांवर घराणेशाहीचे आरोप? सिद्धरामय्या म्हणतात, “मतदारांचा कल, कार्यकर्ते-नेत्यांच्या शिफारशी…!”

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या पुढील पंचवार्षिक कालावधीसाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती संस्था, धान्य अधिकोष सहकारी संस्था, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था अशा विविध मतदारसंघाची अंतिम मतदार यादी ६ मे २०१७ या अर्हता दिनांकावर दुरुस्ती आणि वगळणीसह निश्चित करण्यात आली. परभणी हिंगोली जिल्ह्य़ातील तब्बल १४ तालुक्यांतल्या संस्था या बँकेसाठी मतदार आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघ सर्वाधिक मतदारांचा असून या मतदारसंघातील मतदारांची संख्या ९४३ एवढी आहे, तर या मतदारसंघातल्या अपात्र संस्थांची संख्या पंधरा एवढी आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक २०१५ या वर्षी झाली होती. बोर्डीकर-वरपूडकर यांच्या जय तुळजाभवानी शेतकरी विकास पॅनेलला १५ पैकी १२ जागा मिळाल्या होत्या.  या वेळी बोर्डीकर- वरपूडकर यांच्यात प्रासंगिक ऐक्य दिसून आले होते. या दोघांच्या संयुक्त पॅनेलचे ५ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे पॅनेलच्या सर्व संचालकांची संख्या १७ झाली होती. सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील बँक बचाव पॅनेलला त्या वेळी मतदारांनी साफ नाकारले. या पॅनेलमधील आमदार बाबाजानी दुर्राणी, लक्ष्मणराव गोळेगावकर, राजेश विटेकर हे तिघे निवडून आले. यातील विटेकर हे निवडणुकीनंतर लगेचच बोर्डीकर-वरपुडकर गटात सहभागी झाले. अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे स्वत:च्या गटात ताब्यात घेऊन बँकेवर बोर्डीकर यांनी आपला प्रभाव कायम ठेवला. या वेळी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार कुंडलिक नागरे यांची निवड झाली होती. २०१८ साली मार्च महिन्यात नागरे यांचे निधन झाले, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची पुन्हा नव्याने निवडणूक लागली. या वेळी अध्यक्षपदावरून वरपूडकर-बोर्डीकर यांच्यात सामना रंगला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी वरपूडकर यांचा अर्ज ऐन वेळी बाद झाल्याने वरपूडकर गटाचे पंडित चोखट यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. चोखट यांनी बोर्डीकर गटाच्या विजय जामकर यांचा पराभव केला. अध्यक्षपदाची सूत्रे हाती येण्यापूर्वी चोखट यांच्याकडे बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. २०१५ साली निवडल्या गेलेल्या संचालक मंडळाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करा, असे निर्देश एक वर्षांपूर्वीच उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. बँकेचा संचालक मंडळाचा कालावधी संपल्यानंतर निवडणुकीची पूर्वतयारी करण्यात आली, मात्र पुढे करोनाचे संकट उद्भवले. त्यामुळे जवळपास १० ते ११ महिने ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली. अपवाद वगळता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी नवे चेहरे सहसा दिसत नाहीत. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना १९१७ या वर्षी झालेली असून बँकेने तीन वर्षांपूर्वीच शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे.

मातब्बर नेत्यांची कसोटी

* परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्य़ांत दबदबा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी आजवर या बँकेवर आपला प्रभाव ठेवला असून मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदांवरील अनेक राजकीय नेते या बँकेच्या संचालक पदावर निवडून आले आहेत.

* आता आमदार सुरेश वरपूडकर, आमदार बाबाजानी दुर्रानी, तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश देशमुख, साहेबराव पाटील गोरेगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजेश विटेकर असे मातब्बर पुढारी जिल्हा बँकेच्या संचालक पदावर आहेत.

* आगामी निवडणुकीत या सर्वाचीच प्रतिष्ठा पणाला लागणार असून जिल्हा बँकेवर आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी या सर्वाची मोर्चेबांधणी सुरू आहे.

दीड हजारांहून अधिक मतदार

अंतिम मतदारयादीनुसार सर्व मतदारसंघांतील एकूण अंतिम मतदारसंख्या १६८० एवढी असून त्यातील १५९ मतदार अपात्र आहेत, तर  १५२१ मतदारांचा अंतिम यादीत समावेश आहे.