जम्मू- काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले भारतीय लष्करातील जवान शुभम मुस्तापुरे यांच्या निधनाने परभणीत शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच शुभम मुस्तापुरेंनी आई- वडिलांना घरी फोन केला होता. आपण दोन दिवसांत गावी येतोय, असे त्यांनी कळवले होते. मात्र, आता तिरंग्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव गावात येत असल्याने ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत.

पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी येथे नियंत्रण रेषेवर मंगळवारी सकाळी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि उखळी तोफगोळ्यांचा मारा केला. यात मुस्तापुरेंसह एक अधिकारी व आणखी दोन जवान जखमी झाले. चारही जखमींना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारांदरम्यान मुस्तापुरे यांचा मृत्यू झाला.
मुस्तापुरे हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे सुपुत्र आहेत. अवघ्या २० व्या वर्षी मुस्तापुरेंना प्राण गमवावे लागल्याने गावात शोककळा पसरली आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Sonam Wangchuk
“मी पुन्हा येईन!” २१ दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण घेतलं मागे, मोदी आणि शाहांचं नाव घेत म्हणाले…
Shukra And Rahu Yuti
७ दिवसांनी ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १८ वर्षांनंतर २ ग्रहांची होतेय ‘महायुती’; लक्ष्मी येऊ शकते तुमच्या दारी

घरची परिस्थिती हलाखीची
शुभम यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. शुभम यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण चाटोरीतील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात झाले. कुटुंबीयांना हातभार लावता यावा म्हणून शुभम मेहनत करुन सैन्यात भरती झाला, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मुळात सुदृढ शरीर नसताना त्याने अत्यंत मेहनतीने ते कमावले, असेही नातेवाईकांनी आवर्जून सांगितले. शुभम यांचे वडील चाटोरी येथे शिवणकाम करतात तर आई अंगणवाडीत मुलांचा खाऊ तयार करते.