News Flash

इसिस संशयित शाहीद खानला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

एटीएसने परभणीतून शाहीद खान नावाच्या तरुणाला १ किलो स्फोटकांसह ताब्यात घेतले होते.

इसिस या दहशतवादी संघटनेच्‍या संपर्कात असल्याच्या संशयावरुन परभणीतून अटक करण्यात आलेल्या शाहीद खानला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. एटीएसने परभणीतून शाहीद खान नावाच्या तरुणाला रविवारी १ किलो स्फोटकांसह ताब्यात घेतले होते. यापूर्वी इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून शनिवारी रिझवान खानला कल्याणमधून अटक करण्यात आले होते. मराठवाड्यातील तरुण मोठ्या प्रमाणात दहशतवादी होण्यासाठी इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर आठ दिवसांपासून दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी परभणी शहरात पाळत ठेवून होते. काही दिवसांपूर्वी एटीएसने परभणीतून नासेरबिन चाऊसला अटक केली होती. तो इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय होता. नासेरबिन चाऊसच्या चौकशीतून शाहीद खानचे नाव समोर आल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2016 8:41 pm

Web Title: parbhani isis suspected shahid khan in police custody
Next Stories
1 घरगुती वादातून ‘त्याने’ केला भावाच्या बायकोवर गोळीबार
2 मुख्यमंत्र्यांनी केले कोपर्डीतील पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
3 इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून परभणीतून एकाला अटक
Just Now!
X