News Flash

महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या

"माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत होती"

परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.

परभणीत महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मिटकरी असे या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये महिलेने धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे.

परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सचिनने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात सचिनने महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. ‘त्या महिलेने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत होती. त्या महिलेचे आणखी दोन तरुणांशी संबंध असून तिने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला. याला कंटाळून आत्महत्या करत आहे’, असे त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 10:56 am

Web Title: parbhani married man committed suicide after women threats physical relation
Next Stories
1 दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान-व्यंकय्या नायडू
2 पुन्हा जोमाने समोर येण्यासाठी तनुश्रीने घेतला ब्रेक
3 यूपीएच्या चुका काढत आता पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मौन का?, वाघेलांची मोदींवर टीका
Just Now!
X