05 April 2020

News Flash

शिवसेनेच्या वतीने आज परभणी ‘बंद’

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे उद्या (बुधवारी) ‘परभणी बंद’चे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. शहरातील बाजारपेठ बंद राहणार आहे.

| June 4, 2014 02:15 am

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे उद्या (बुधवारी) ‘परभणी बंद’चे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. शहरातील बाजारपेठ बंद राहणार आहे.
परभणी बाजार समितीतील कापूस खरेदी बंद राहणार आहे, तर विधानसभा अधिवेशनावर ५ जूनला निघणारा धनगर समाजाचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. दुखवटा व्यक्त करण्यासाठी उद्या ‘बंद’ पाळण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. ‘बंद’मध्ये व्यापारी, शैक्षणिक संस्था यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार संजय जाधव, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. शिवाजी दळणर, जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, सुधाकर खराटे, माणिक पोंढे, अजित वरपुडकर, गंगाप्रसाद आणेराव आदींनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2014 2:15 am

Web Title: parbhani off today on behalf of shiv sena
टॅग Parbhani,Shiv Sena
Next Stories
1 वादळी पावसाचे जिल्हय़ात दोन बळी
2 वादळी पावसाचे जिल्हय़ात दोन बळी
3 मुंडे यांच्या दौ-याची चौंडीकरांना हुरहुर…
Just Now!
X