कोपरगाव : तालुक्यातील मुर्शतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्त्रीलंपट शिक्षकाने अभ्यासाच्या नावाखाली शाळेतच लैंगिक शिक्षणाचे धडे सुरू केले. त्याची वाच्यता विद्यार्थ्यांनी केल्यानंतर त्यांचे पालक थेट शाळेत धडकले व त्यांनी सदरच्या शिक्षकास चांगलाच चोप देत त्याची धुलाई केली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, या बाबत गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्याशी संपर्क होऊ  शकला नाही. मात्र मुख्याध्यापक व सह शिक्षकासह सर्व जण प्रकरण निपटण्याच्या प्रयत्नात होते.

या बाबत अधिक माहिती अशी, जिल्हा परिषदेच्या या शाळेत परिसर अभ्यासाच्या नावाखाली पाचवीच्या विद्यार्थ्यांना आहार विहार आणि कुटुंबामधील मुला-मुलीमध्ये आहारात बदल का केला जातो, या विषयावर धडा शिकवला जात होता.

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

मात्र या शिक्षकाने त्या धडय़ाऐवजी चक्क लैंगिकतेवर धडा सुरू केला. ही बाब काही विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर पालकांना सांगितली.

त्यामुळे पालकांत तीव्र संतापाची लाट उसळली. मंगळवारी सदर शिक्षक शाळेत आल्याचे कळताच पालकांनी त्याची वर्गातच धुलाई केली. धुलाईनंतर तो गयावया करू लागला. माफी मागू लागला. गटशिक्षणाधिकारी शेख या नगर येथे बैठकीस गेल्याचे समजले.

सदर शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्या शिक्षकाला पाचवीच्या वर्गावरून काढून चौथीच्या वर्गावर टाकले. सदर शिक्षकाला त्वरित निलंबित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.