परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र पाण्याअभावी शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पूर्णत: बंद झाले. पूर्वी या केंद्रातील तीन संच बंद होते. पाण्याअभावी एक संच याच आठवडय़ात बंद पडला आणि शुक्रवारी अन्य संच बंद झाल्याने वीजनिर्मिती थांबली. या केंद्रातून १ हजार १३० मेगाव्ॉट वीजनिर्मिती होत होती. माजलगाव धरणात पाणीसाठा नसल्याने वीजनिर्मिती थांबली आहे. माजलगाव धरणात पाणीसाठी नसल्याने वीजनिर्मितीसाठी अडचण होईल, असे परळी औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी सिंचन विभागाला कळविले होते. धरणातच पाणी नसल्याने वीजनिर्मिती थांबली आहे.