पार्थ अजित पवार विधानसभा लढवणार अशी चर्चा सुरू असतानाच या सगळ्या चर्चेवर स्पष्टीकरण देणारं अजित पवार यांचंच वक्तव्य समोर आलं आहे. आजकाल मुलं त्यांचा निर्णय घेत असतात. पार्थ पवार यांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवायचं की नाही याबाबत पक्षाने काहीही स्पष्ट केलेलं नाही. पार्थ पवार मतदारसंघांमधून फिरायला लागले याचा अर्थ ते निवडणूक लढवणार असा होत नाही. पक्षवाढीसाठी प्रत्येकजणच काम करत असतो असं अजित पवारांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शिरूरमधून पवार कुटुंबातले चारजण निवडणूक लढवतील ही बातमीही चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बारामतीतली जागा आम्ही जिंकू असं भाजपाने म्हणणं म्हणजे पोरकटपणा आहे. भाजपावाले बोलले म्हणजे सीट जिंकता येत नाही, असाही टोला अजित पवारांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आहेत त्यामुळे ते 43 नाही 48 जागा जिंकायच्या असंही म्हणतील असेही वक्तव्य अजित पवार यांनी केले.

प्रियंका गांधी यांची लखनऊमध्ये रॅली झाली त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. प्रियंका गांधी यांनी घेतलेली रॅली काँग्रेसचा प्रभाव दाखवून देते आहे असे अजित पवार म्हटले. मायावती आणि अखिलेश एकत्र आले, मतदार वेगवेगळा कौल देतात. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार आहे असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.