X

बाप्पाला आवडणारे मोदक बनवा आणि जिंका आकर्षक बक्षीसं

गणेशोत्सव म्हटलं की गणपतीची मूर्तीची, सजावट यांबरोबरच आपल्याला आठवतो तो बाप्पाला प्रिय असणारा मोदक. मग कुटुंबातील सुगरणीची एका अर्थाने यादिवशी परीक्षाच असते. येणाऱ्या बाप्पाला आणि घरातील मंडळींना खुश करण्यासाछी महिला आपल्यातील पाककला पणाला लावतात. या मोदकाचे सारण, त्याच्या पाकळ्या जमणे यातील मुख्य कसब असते. हे मोदक खाऊन आलेला तृप्तीचा ढेकर ही या महिलांना मिळणारी खरी पावती असते. उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक आपल्याला माहित असतात पण त्याशिवायही काही मोदक तुम्ही ट्राय करत असाल तर त्याची रेसिपी तुम्ही आम्हाला नक्की पाठवा. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने एका खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये तुम्ही आपल्या मोदकांच्या आणि इतरही काही रेसिपी पाठवू शकता. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मिळणार आहेत. भाग्यवान विजेत्याला कुटुंबासह गोव्यामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच आठवड्याला आणखीही खास बक्षीसं मिळणार आहेत.

पाहुयात ड्रायफूट मोदकाची एक खास रेसिपी

मोदकाच्या पारीसाठी

तांदळाचे पीठ – दिड कप

मीठ – चवीनुसार

तेल – गरजेनुसार

सारणासाठी

किसलेला बदाम – पाव चमचा

खजुराचे तुकडे – अर्धा चमचा

कोरडे खोबरे – १०० ग्रॅम

आक्रोड – पाव कप

काजू – पाव कप

जर्दाळू – पाव कप

बेदाणे – पाव कप

केशर – गरजेनुसार

तूप – अर्धा चमचा

वेलची पावडर – चिमूटभर

साखर – पाव कप

कृती

– प्रथम एका भांड्यात एक चतुर्थांश भाग पाणी घेऊन त्यात १ लहान चमचा तेल घालून हे पाणी गरम करावे.

– पाणी उकळत असताना त्यात हळूहळू तांदूळाचं पीठ घालून सतत एका बाजूने ढवळत रहावे. यावेळी पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

– पीठ या गरम पाण्यात चांगलं एकजीव झाल्यानंतर या भांड्यावर काही काळ झाकण ठेवा. ज्यामुळे पीठ गरम पाण्यात नीट एकजीव होऊन मोदकाला आवश्यक असलेली पारी तयार करण्यास सहज शक्य होईल.

– त्यानंतर हे पीठ एका मोठ्या परातीत घेऊन ते चांगलं मळून घ्यावं. यावेळी पीठ मळताना हाताच्या तळव्यांना तेल लावावे. जेणेकरून हे पीठ हाताला चिकटणार नाही. त्यानंतर या पीठाचा मऊसर असा गोळा तयार करावा.

– यानंतर एका पातेल्यात शुद्ध तूप आणि वर दिलेले सारा सुकामेवा घालावा. त्यानंतर त्यात पीठीसाखर घालून काही वेळ मंद आचेवर गॅसवर गरम करावं. त्यानंतर तयार झालेलं सारण एका बाजूला काढून ठेवावं.

– आता तयार पीठाची लहानशी गोळी करुन त्याला हाताच्या तळव्याने थोडासा लहान पारीसारखा आकार द्यावा. यामध्ये एका चमच्याच्या सहाय्याने तयार सारण भरुन पीठाची पारी बंद करावी. ही पारी बंद करताना त्याला बोटांच्या सहाय्याने फुलांच्या पाकळीचा आकार द्यावा.

– पारीला फुलांचा आकार देत असताना हळूहळू या पारीचं तोंड बंद करावं. त्यानंतर मोदक तयार करण्याची पहिली पायरी पूर्ण होतं.

– मोदक तयार झाल्यानंतर एका मोदक पात्रात तळाला थोडसं पाणी घेऊन त्यावर मोदकपात्राच्या प्लेट्स ठेऊन मोदक ठेवावेत. हे मोदक १० ते १२ मिनीटे वाफवाते. त्यानंतर मोदक पात्राचं झाकणं काढून मोदक काढून घ्यावेत.

अशीच एखादी पाककृती तुम्हाला येत असेल आणि ती सर्वांना सांगण्याची इच्छा असेल तर यामध्ये जरुर सहभागी व्हा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागात प्रसिद्ध असणारी, परंतु देशातल्या अन्य लोकांना अपरिचित असलेली मोदकाची आणि इतरही पाककृतीही जगभरात पोहोचवू शकणार आहात. प्रेस्टिज सहप्रायोजक असलेल्या या पाककला स्पर्धेचे ग्रेटर बँक गोल्ड लोन हे बँकिंग पार्टनर आहेत. चला तर मग या खास पाककला स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमच्यातल्या पाककलेच्या कौशल्याला वाव द्या! सहभागासाठी भेट द्या: www.loksatta.com/paakkala