19 September 2020

News Flash

शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही : विजय वडेट्टीवार

नक्षलवादी चकमकीतील शहिदांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार वाहिली श्रद्धांजली

(संग्रहित छायाचित्र)

भामरागड तालुक्यातील कोठी हद्दीतील पोयरकोटी कोपर्शी जंगलात नक्षलवाद्यांबरोबरच्या चकमकीत शहिद झालेल्यांना,  चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

शहीद झालेल्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने (वय 29) व पोलीस शिपाई किशोर आत्राम (वय 30) यांचा समावेश आहे. धनाजी होनमाने यांना नुकतेच नक्षलविरोधी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले होते. या घटनेत एक जवानही जखमी झाला आहे. जखमी पोलीस जवानावर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पालकमंत्र्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही असे ते म्हणाले.

शहीद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबियांवर या घटनेचा मोठा आघात झाला आहे, ही घटना अतिशय दुर्दैवी घटना असून शहिदांच्या कुटुंबियांना संपूर्ण मदत दिली जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईहून दुरध्वनीद्वारे या घटनेबाबत शोकसंदेश प्रशासनाला दिला. ते बैठकीसाठी मुंबई येथे पोहचले असताना त्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेवून तातडीने पोलीस प्रशासनाला संबंधित जवानांच्या कुटुंबियांना धीर देण्याबाबत विनंती केली. या घटनेची चौकशी करण्याबाबतही वरिष्ठ पोलीस यंत्रणेशी बोलणी सूरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2020 8:40 pm

Web Title: participating in the grief of the families of the martyred soldiers vijay wadettiwar msr 87
Next Stories
1 वर्धा : रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या आरोपींना ३५ लाखांचा दंड
2 डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीत अटक
3 coronavirus : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन्ही पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर
Just Now!
X