अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा २०१९ वर्षांचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात राज्यात महिलांमधून परतवाडा येथील पर्वणी पाटील अव्वल आली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि मार्गदर्शकांना दिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी विविध पदांसाठी परीक्षा घेतली होती. सध्या पर्वणी ही नागपूर येथे परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. पर्वणी हिने अभियांत्रिकी पदवी मिळवल्यानंतर स्पर्धा परीक्षेची वाट चोखाळली. याआधी दिलेल्या परीक्षेत तिचा राज्यात महिलांमधून तिसरा क्रमांक आला होता.

India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
All the four Municipal Corporations like Mumbai Thane Pune Nagpur have emphasized on public awareness to increase the voter turnout in metropolitan cities
मतटक्का वाढवण्याचे लक्ष्य; आयोगाला मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत चिंता; जनजागृतीवर भर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वनपरीक्षेत्र अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, तहसीलदार अशा विविध पदांच्या परीक्षांमध्ये पर्वणी हिने यश मिळवले आहे. अचलपूर तालुक्यातील कुष्टा हे तिचे मूळ गाव आहे.

वडील रवींद्र पाटील हे पथ्रोट येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तिची आई करजगाव येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. परतवाडा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर संगणक अभियांत्रिकीचे पदवीपर्यंतचे शिक्षण तिने मुंबई येथे घेतले. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. नियमित अभ्यास आणि वाचन हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे तिने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.