28 February 2021

News Flash

दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू- पाशा पटेल

"शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालं आहे"

नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळालं आहे. आंदोलनाच्या नावाखाली तमाशा सुरू आहे अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे. पाशा पटेल यांनी यावेळी शरद पवार कृषी कायद्यांवरील चर्चेदरम्यान शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते? अशी विचारणादेखील केली आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“दोन महिन्यांहून अधिक काळ राजधानीत आंदोलन सुरू आहे. केंद्र शासनाने सुरुवातीपासून शेतकऱ्यांशी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या चारपैकी तीन मागण्या मान्य करूनही विरोध सुरू असून तो नेमका कशासाठी आहे याचे गमक कळलं नाही. शेतकरी नेत्यांना आंदोलनाच्या नावावरून तमाशा करण्यात रस आहे,” अशी टीका पाशा पटेल यांनी केली आहे.

पवारांवर टीकास्त्र
पाशा पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीकेची तोफ डागली. “शरद पवार राज्यसभेचे सदस्य आहेत. राज्यसभेमध्ये शेतकरी कायद्यांवर चर्चा सुरू होती त्यावेळी शरद पवार राज्यसभेत उपस्थित का नव्हते?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

पर्यावरणाशी बांधिलकी
“पृथ्वी संरक्षण चळवळ घेऊन मी देशभर फिरत आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं महत्त्वाचं आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुधारित इंजिनाची वाहनं वापरण्याच्या आदेशाचे स्वागत करतो. वातावरण बदलामुळे नुकसान रोखण्यासाठी पिंपळ, वड, उंबर यासारखी पैसे आणि ऑक्सिजन मिळेल अशा झाडांची शेतकऱ्यांनी निवड केली पाहिजे. मांजरा व गोदावरी या नदी लातूर जिल्ह्यातून वाहत असूनही येथे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचे निराकरण करण्यासाठी दोन्ही नदीच्या किनारी चार हजार हेक्टर क्षेत्रात वीस हजार बांबूची झाडे लावण्याचा संकल्प केला,” असल्याचं पाशा पटेल यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2021 9:28 pm

Web Title: pasha patel criticise delhi farmer protest over farm laws sgy 87
Next Stories
1 कोल्हापुरी चपलांच्या मागणीत वाढ
2 ‘गोकुळ’च्या सभेत कारभाराचा पंचनामा
3 कोल्हापूर: पावनगडावर तोफगोळ्यांचा साठा सापडला
Just Now!
X