चंद्रपूर येथील घुग्घुस येथे रुग्णाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे कर्मचारी असणाऱ्या सुरेश अरविंद हिरादेवे (३८) यांना उपचारासाठी राजीव रतन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शौचाला जाण्याचा बहाणा करत त्यांनी रुग्णालयाच्या खिडकीला गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्येची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे कर्मचारी सुरेश हिरादेवे यांनी सोमवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मध्यरात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास शौचालयास जातो असे सांगून ते बेडवरून उठले आणि हॉस्पिटलच्या खिडकीला गळफास लावून आत्महत्या केली. हिरादेवे मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करायचे असं सांगण्यात आलं आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 24, 2020 6:00 pm