20 October 2020

News Flash

दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या

चंद्रकांत चौधरी यांनी त्यांना दाखल केलेल्या वॉर्डच्या समोरील रूममधून खाली उडी मारली.

बोईसर : येथील चिन्मय रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत चौधरी (४२) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बोईसर येथील चिन्मय रुग्णालयात १५ सप्टेंबर रोजी चंद्रकांत चौधरी यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे बिल पाहिल्यावर त्यांना चक्कर आली त्यानंतर त्यांना पुन्हा याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र १९ सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता त्यांना पहाटे चार वाजताच्या सुमारास अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले.

चंद्रकांत चौधरी यांनी त्यांना दाखल केलेल्या वॉर्डच्या समोरील रूममधून खाली उडी मारली. चौधरी यांना रुग्णालयामध्ये दाखल करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाईकांकडून रुग्णालयावर आरोप

चिन्मय रुग्णालयाला असलेल्या खिडकीला वरच्या मजल्यावरदेखील कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी नाही. यातच अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना पहाटेच्या वेळी सामान्य वॉर्डमध्ये चंद्रकांत चौधरी यांना हलविण्यात का आले, असे अनेक प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत. यातच रुग्णालयात प्रमाणापेक्षा अधिक बिल आकारले जात असल्याचा आरोपदेखील केला जात असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात आत्महत्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्महत्या की हत्या याबाबत अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 1:27 am

Web Title: patient commits suicide by jumping from second floor zws 70
Next Stories
1 सात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात
2 बीडमध्ये शरद पवार यांच्याकडून इतिहासाची पुनरावृत्ती?
3 सात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्णसेवा
Just Now!
X