News Flash

मनोर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल

रुग्णालय गरोदर मातांसाठी व प्रसूतीसाठी वरदान ठरलेले आहे. दर महिन्याला येथे सुमारे नऊ प्रसूती होत आहेत.

वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ

पालघर : तीन आठवडय़ांपासून मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात वाट धरावी लागत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक भरुदड बसत आहे.

दुर्वेस, सोमटा आणि मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाठविण्यात आलेल्या रुग्णांसह मनोरलगत परिसरातील ग्रामीणबहुल भागातील गरजू रुग्ण मोठय़ा संख्येने मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. हे रुग्णालय गरोदर मातांसाठी व प्रसूतीसाठी वरदान ठरलेले आहे. दर महिन्याला येथे सुमारे नऊ प्रसूती होत आहेत. असे असतानाही या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी येत नसल्यामुळे रुग्णांना महागडय़ा असलेल्या खासगी रुग्णालये, दवाखान्यात उपचारांसाठी नाइलाजाने जावे लागत आहे.

यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे गोरगरिबांसाठी असलेल्या व शासनाने दिलेल्या आरोग्य सुविधांचा लाभ घेता येत नाही.  या रुग्णालयात तातडीने वैद्यकीय अधिकारी नेमावा, अशी मागणी समोर येत आहे.

मनोर रुग्णालयात ग्रामीण भागातील गरजू रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची तरतूद केली आहे. त्यापैकी दोन अधिकारी दवाखान्यात रुजूही झालेले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची गैरसोय होणार नाही याची खात्री आहे.

– डॉ. दिनकर गावित, वैद्यकीय अधीक्षक, पालघर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 4:25 pm

Web Title: patient condition at manor rural hospital akp 94
Next Stories
1 अतिक्रमणावरील कारवाईबाबत उदासीनता
2 बॅँकांच्या वेळापत्रकात बदल?
3 रोगाच्या प्रादुर्भावाने मोगरा कोमेजला
Just Now!
X