News Flash

तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा; रायगड ट्रस्ट चार एकर जागा देणार!

छत्रपती संभाजीराजे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना फोन केला

Maharashtra Rains Landslide Taliye Mahad Raigad
दगड मातीच्या ढिगाऱ्याने तळीयेतील अनेक जिवांचा घास घेतला.

दुर्घटनाग्रस्त रायगड जिल्ह्यातील महाडमधील दुर्घटनाग्रस्त तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, कारण रायगड ट्रस्टच्यावतीने या गावच्या पुर्नविकासासाठी चार एकर जमीन दिली जाणार  आहे. शिवाय, या संदर्भात महाडाने तातडीच्या बैठकीचे देखील आयोजन करण्यात आले असून, म्हाडाचे अधिकारी व मंत्री तळीये गावात जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आज राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना या संदर्भात फोन केल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता रायगड ट्रस्टची चार एकर जागा तळीये गावाच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली आहे. या अगोदरच तळीये गावाच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाने घेतलेली आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. त्यानंतर आता पुनर्विकसाच्या नियोजनासंदर्भात बैठक बोलावण्यात आलेली आहे. अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.

म्हाडा वसवणार तळीये गाव

तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३२ घरं गाडली गेली. तर इतर घरांचंही नुकसान झालं. अवघं गावचं उद्ध्वस्त झालं असून, हे गाव पुन्हा वसवण्याचं काम म्हाडाकडून केलं जाणार आहे. गावात उभारण्यात येणाऱ्या घरांची रेखाचित्र ट्वीट करत आव्हाड यांनी याची माहिती दिलेली आहे.

तळीये गाव पुन्हा वसवण्याची जबाबदारी म्हाडाने घेतली; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

तळीये इथं आत्तापर्यंत ५३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात ११ मृतदेह सापडले असले तरी ३१ जण मात्र ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात होतं. या अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करा आणि त्यांना बाहेर काढू नका अशी मागणी या गावातले नागरिक, मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत होते. त्यामुळे आता शोध आणि बचाव मोहीम थांबवत त्या ३१ बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 4:52 pm

Web Title: pave the way for redevelopment of taliye village raigad trust to give four acres of land msr 87
टॅग : Maharashtra Rain
Next Stories
1 “राज्य सरकार कमी पडणार नाही, केंद्राने आपली जबाबदारी पार पाडावी”
2 भास्कर जाधव प्रकरण : “या सोंगाड्यामुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झाले ते कोणत्या नैतिकतेत बसते?”; भाजपा नेत्याचा सवाल
3 “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, अजित पवार यांचा भास्कर जाधव यांना टोला
Just Now!
X