News Flash

“१० कोटी द्या अन्यथा शासकीय कार्यालयं बॉम्बने उडवून देईल” अशी ई मेलद्वारे धमकी देणाऱ्यास अटक!

नांदेडमधील अर्धापूर येथून माथेफिरूला पकडलं ; वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रवींद्र बराटेच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून अनेक पथकाच्या माध्यमातून तपास सुरू होता.(प्रतिकात्मक छायाचित्र)

सुरक्षा कर म्हणून दहा कोटी आणि प्रतिमाह पाच कोटी रुपये द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय  या महत्वाच्या कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या माथेफिरुला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्धापूर येथुन रविवारी अट्क केली. त्याच्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेल आयडीवर धमकीचा मे आला होता. या मेलमध्ये पैशाची मागणी करण्यात आली होती. पैसे न दिल्यास जिल्ह्यातील सर्व महत्वाची कार्यालये उडवून देण्यात येतील, असा इशारा देण्यात आला होता. १२५ बॉम्ब फुटायला तयार आहेत, असे म्हणत सोबत १३२ ठिकाणांची यादी जोडली होती. बॉम्बची क्षमता एक कि.मी. असल्याचे मेल मध्ये नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर सोपविण्यात आली होती. अटक केलेल्या माथेफिरुचे नाव शेख अब्दूल रफिक अब्दूल रऊफ असे असून तो उच्च विद्याविभूषीत आहे. त्याने एम.एससी कॉम्प्युटर पूर्ण केले आहे. हा मेल मराठी भाषेत शब्दात लिहिला होता.

”नांदेडमध्ये कोट्यवधीची मालमत्ता आणि अमूल्य जीव धोक्यात आहेत, वेळेत निर्णय घेतला नाही तर सर्व नष्ट होईल, आम्हाला सामान्य लोकात भय पसरवायचं नाही, जोपर्यंत पैसे येत राहतील हे गोपनीय राहील.” असे पत्रात नमूद आहे. विशेष म्हणजे या पत्रामध्ये स्वत: प्रश्‍न विचारून स्वतःच उत्तरे दिली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या संदर्भात या क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क साधून माहिती घेतली, तसेच या मेलचा बारकाईने अभ्यास केला. यासाठी सायबर सेलची मदत घेण्यात आली. तपासात हा मेल जिल्ह्यातील अर्धापूर येथून आल्याची खात्री पटताच त्यांनी एक पथक पाठवून आरोपीला अट्क केली. पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, पोलीस अधीक्षक प्रमोद्कूमार शेवाळे या वरिष्ठ अधिकार्‍यांचे या प्रकरणाकडे लक्ष होते. पोलीस उपनिरीक्षक अशिष बोराटे, अंमलदार गंगाधर कदम,बजरंग बोडके यांनी कामगिरी फत्ते केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 8:59 pm

Web Title: pay rs 10 crore or else the government office in the district will be bombed msr 87
Next Stories
1 Covid Crisis : राज्यातील सहा हजार बालरोग तज्ज्ञांना कोविड टास्क फोर्सने केले मार्गदर्शन!
2 तिसरी लाट रोखण्यासाठी नवा कित्ता; गावकऱ्यांना गांधीवादी डॉक्टरकडून धडे
3 Video : आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण
Just Now!
X