News Flash

शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या पायल रोहतगीला अटक करा – नवाब मलिक

'राज्यात वातावरण चिघळण्याची वाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहात आहेत का?'

नवाब मलिक

पायल रोहतगी हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा देत तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायल रोहतगी हिच्यावर कारवाई करणार नसतील तर याविरोधात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन राष्ट्रवादी उभारेल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

‘शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र जातीत’; बॉलिवूड अभिनेत्रीचं वादग्रस्त ट्विट

पायल रोहतगीनेवादग्रस्त विधान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. पायल रोहतगी हिला महाराजांचा अपमान करण्यासाठी सोडली आहे का ? असा संतप्त सवालही यावेली नवाब मलिक यांनी केला आहे.

राज्यात वातावरण चिघळण्याची वाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहात आहेत का? असा सवाल करतानाच जर मुख्यमंत्र्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात येत नसेल तर राज्यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 4:31 pm

Web Title: payal rohtagi chhatrapati shivaji maharaj ncp nawab malik cm devendra fadanvis
Next Stories
1 पुढच्या वेळी कोण मुख्यमंत्री असेल?; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास
2 भाजपाचे यश पहायला आज गोपीनाथ मुंडे हवे होते – मुख्यमंत्री
3 Maharashtra SSC Result 2019 Date : बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही यंदा लवकर?
Just Now!
X