News Flash

पायल रोहतागीकडून शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा ‘बिग बॉस’ कोण? – शालिनी ठाकरे

'स्वत:ला रामभक्त आणि नमोभक्त म्हणवणारी पायल रोहतगी आता भाजपाची ट्रोल म्हणूनच जणू काम करत आहे'

वादग्रस्त अभिनेत्री पायल रोहतगी हिने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारं भाष्य केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी तिच्यावर टीका केली आहे. ‘पायल रोहतागीकडून शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा ‘बिग बॉस’ कोण आहे? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

‘शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या पायल रोहतगीला अटक करा’

‘स्वत:ला रामभक्त आणि नमोभक्त म्हणवणारी पायल रोहतगी आता भाजपाची ट्रोल म्हणूनच जणू काम करत आहे. विविध धर्मांमध्ये तसंच समाजांमध्ये द्वेष पसरवणारे ट्वीट ती करत असते. काही दिवसांपूर्वीच समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचीही तिने बदनामी केली होती. आणि आता तर चक्क महाराष्ट्राचं आराध्यदैवत शिवाजी महाराजांचा तिने अपमान केला आहे. सवंग प्रसिद्धीसाठी पायल कोणत्याही थराला जाऊ शकते. मात्र, तिच्याकडून छत्रपती शिवरायांची बदनामी करवून घेणारा पडद्याआडचा ‘बिग बॉस’ कोण? हे शोधायला हवं”, असं मत शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

‘शिवाजी महाराजांचा जन्म शूद्र जातीत’; बॉलिवूड अभिनेत्रीचं वादग्रस्त ट्विट

दरम्यान पायल रोहतगी हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा देत तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायल रोहतगी हिच्यावर कारवाई करणार नसतील तर याविरोधात राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन राष्ट्रवादी उभारेल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 5:48 pm

Web Title: payal rohtagi disrespect chhatrapati shivaji maharaj shalini thackeray
Next Stories
1 निधी चौधरींना बडतर्फ करा, मनपा मुख्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
2 निकाल लागल्यापासून भाजपा नेते मोकाट सुटले आहेत – नवाब मलिक
3 शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या पायल रोहतगीला अटक करा – नवाब मलिक
Just Now!
X