News Flash

मुंबई, पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकाही लसींची थेट खरेदी करणार!

लसींच्या तुटवड्यामुळे आज भागातलं लसीकऱण बंद ठेवण्यात आलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी चिंचवडमधला लसींचा तुटवडा लक्षात घेता, लसींच्या किमान १५ लाख मात्रांसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचं नियोजन करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

लसींच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवड भागातलं लसीकरण आज बंद ठेवण्यात आलं आहे. लसीकरण केंद्र बंद असल्याने लोकांनी लसीकरणासाठी गर्दी करु नये असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. दुपारपर्यंत राज्याच्या आरोग्यविभागाकडून महापालिकेला लसींचा पुरवठा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारचं लसीकऱणाचं नियोजन लसींचा साठा झाल्यावरच जाहीर करणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून थेट लस विकत घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री स्वतः म्हणाले की महापालिका प्रशासनाला जर थेट लसी विकत घ्यायच्या असतील तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणं आवश्यक नाही.

महापौर उषा ढोरे असंही म्हणाल्या की, एकदा का लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाला की संपूर्ण शहराचं लसीकरण करता येईल. सध्या लसींच्या कमतरतेमुळे काही ठिकाणचं लसीकऱण थांबवावं लागत आहे. नागरिक दररोज लसीकऱण केंद्राबाहेर गर्दी करत आहेत आणि मोठ्या रांगा लावत आहेत. यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आम्ही लसींची खरेदी कऱण्याचं नियोजन करत आहोत आणि लसींचा पुरेसा साठाही करणार आहोत. ज्यामुळे गर्दी टाळून लसीकऱण पूर्ण करता येईल.

मुंबई आणि पुण्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही थेट लस खरेदी कऱणारी तिसरी महानगरपालिका ठरणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 4:19 pm

Web Title: pcmc is planning for global tender of vaccines vsk 98
Next Stories
1 महाराष्ट्रावर ‘तौते’ चक्रीवादळाचं संकट; पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा
2 “…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा
3 “…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” शिवसेना आमदाराच्या टीकेमुळे वाद पेटण्याची चिन्हं
Just Now!
X