News Flash

परदेशातील व्यक्तींचा पळवाटांनी महाराष्ट्रात प्रवेश; आरोग्यमंत्र्यांकडून धक्कादायक माहिती

फेज-२ मधून फेज-३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न

छायाचित्र-गणेश शिर्सेकर

महाराष्ट्रातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. गुरूवारी दुपारपर्यंत हा आकडा ४७ होता. त्यात दोन रुग्णांची भर पडली आहे. यात एक रुग्ण लंडनवरून आलेला आहे. तर दुसरा दुबईहून घरी परतला आहे. वाढलेल्या आकड्यांविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बंदी घातलेल्या देशातील लोक दुसऱ्या देशांच्या मार्गे महाराष्ट्रात येत असल्याचं ते म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोनाच्या परिस्थितीची माहिती दिली. ‘राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. मुंबईतील दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत,’ अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ‘प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ३१ तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. फेज-२ मधून फेज-३ मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९, राजेश टोपे यांची माहिती

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांविषयी बोलताना टोपे म्हणाले,’केंद्र सरकारनं करोनाबाधित देशांची यादी तयार केली आहे. या १२ देशातून येणाऱ्या नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, यात बाधित देशातील व्यक्ती थेट त्या देशातून येत नाही. स्पेन, जर्मनी किंवा फ्रान्समधील व्यक्ती भारतात येण्यासाठी व्हाया नेदरलँडमधून येतो. अशा वेळी नेदरलँडच्या व्यक्तीला केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार तपासणी करून सोडून दिलं जातं. त्यांना होम क्वारटाइंनची सक्ती केली जात नाही. अशी युक्ती करून काही लोक करत आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक उड्डाण मंत्र्यांना यासंदर्भात बोललो आहे आणि ते यासंदर्भात कारवाई करणार आहेत,’ असं राजेश टोपे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 2:56 pm

Web Title: people came from via non banned country bmh 90
Next Stories
1 Coronavirus: “महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो; डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सरकारी अधिकारी खरे हिरो”
2 राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९, राजेश टोपे यांची माहिती
3 Coronavirus: उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे
Just Now!
X