11 August 2020

News Flash

सातारा : टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी

शुक्रवारपासून साताऱ्यात पुन्हा टाळेबंदी

सातारा जिल्हयात करोना संसर्गाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी सर्वत्र मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली. सातारा जिल्ह्यात दोन हजार रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन दबावाखाली आलं आहे. पूर्वीच्या टाळेबंदी नंतर शिथिलता देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय चांगलाच अंगलट आला. जूनमध्ये दिलेल्या शिथिलतेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतल्याने पुन्हा जिल्ह्यात शुक्रवार (दि. १७) पासून कडक टाळेबंदी टाळेबंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सुरवातीला सातारा जिल्ह्यात अजिबात रुग्ण नव्हते. परदेशी नागरीकांमुळे व नंतर मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून विना परवाना येणाऱ्यांमुळे
जिल्ह्यात करोना रुग्ण आढळून आले. आता स्थानिकांनी घेतलेल्या शिथिलतेचा गैरफायद्यामुळे गेल्या काही दिवसांत बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे टाळेबंदीचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या नंतर पुन्हा दीर्घ काळासाठी टाळेबंदी होईल या भीतीने बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदी साठी मोठी गर्दी झाल्याचे आढळून आले.

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रतीबंधीत क्षेत्र घोषित केली आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी बाजारात किराणा सामान व जीवनावश्यक गर्दी केली. किराणा मालाची दुकाने, होलसेल व्यापारी, डी मार्ट आदी ठिकाणी मोठी गर्दी पहायला मिळाली. सातारा शहरात बाजारपेठेच्या भागात व मुख्य रस्त्यावर लोक उतरले होते. वाई शहरात संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधित असल्याने, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, मेढा येथे जनता बंद मुळे आधीपासून बाजारपेठ बंद आहे. यामुळे सुरुर महाबळेश्वर रस्त्यावरील डी-मार्ट व अपना बझार मध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. सातारा शहरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 8:19 pm

Web Title: people came out in huge numbers in satara district for shopping ahead of lockdown psd 91
Next Stories
1 टाळेबंदीतील वीज देयके चार भागात विभागणार उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे आश्वासन
2 महाराष्ट्रात ८ हजार ६४१ नवे करोना रुग्ण, २६६ मृत्यूंची नोंद
3 एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X