04 August 2020

News Flash

वर्धा : करोनाबाधितांचा मृतदेह भरवस्तीतून नेऊ नका; नागरिकांची मागणी

प्रशासनासमोर नवा पेच

संग्रहित छायाचित्र

करोनाबाधितांचे मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेणारे वाहन भरवस्तीतून जाऊ नये यासाठी नागरिकांनी आग्रह धरल्याने प्रशासन पेचात पडले आहे. वर्धा शहरातील एका वृध्देचा गुरूवारी मृत्यू झाला. त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्थानिक पूलफैल भागातून नेण्यात आला. यावेळी नगरसेवक पदमाताई रामटेके आणि परवेज खान यांच्या नेतृत्वातील जमावाने ही शववाहिका थांबविली. भरवस्तीतून करोनाबाधितांचा मृतदेह नेऊ नका, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता विशाल रामटेके यांनी केली.

यावेळी अर्धातास पोलीसांसोबत वाद घालण्यात आला. भरवस्तीतून होणारा मृतदेहाचा प्रवास परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा ठरला आहे. स्मशानभूमीवर जाण्यासाठी चार अन्य मार्ग आहे. मात्र त्याऐवजी गरीब लोकांची वस्ती असणाऱ्या सुदर्शननगर, कुरेशी मोहल्ला, पूलफैल याच वसाहतीतून शववाहिका नेल्या जात आहे. यामुळे करोना रूग्ण आढळल्याच्या नेहमी अफवा उडतात. त्याचा लोकांना त्रास होत असल्याचे रामटेके यांनी पोलीसांना सांगितले.

या सर्व वस्तीतले रस्ते अरूंद असून गाड्यांच्या ताफ्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं संतप्त नागरिकांकडून सांगण्यात आलं. नगरसेवक अन्य लोकांना पोलीसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. शववाहिका पूर्णपणे सुरक्षित असते. तसेच त्यात असणारा मृतदेह सुरक्षित वेष्टनात गुंडाळला असतो. विषाणूचा प्रसार होण्याची त्यामुळे एक टक्काही शक्यता नाही, असे पोलिसांनी यावेळी निदर्शनास आणलं. मात्र तरीही नागरिकांनी ऐकूण घेतले नाही. शेवटी पोलीसांनी या प्रसंगात मार्ग काढून शववाहिका स्मशानभूमीपर्यत पोहोचविली. याचवेळी नागरिकांच्या मागणीनुसार वरिष्ठांशी बोलून अन्य मार्ग शोधण्याची आश्वासन देण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते विशाल रामटेके हे म्हणाले की, “हा परिसर प्रामुख्याने अशिक्षित कामगारवर्गाचा आहे. त्यांना आम्हीही बाधा होत नसल्याचे समजावून सांगण्याचा वारंवार प्रयत्न केला. परंतु अत्यंत दाटीचीवाटीचा परिसर असल्याने शववाहिका आणि अन्य वाहनांचा ताफा धोक्याचा ठरू शकत असल्याने मार्ग बदलण्याची विनंती आम्ही केली आहे.” दरम्यान, पालकमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे रामटेके म्हणाले. समाधान न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 5:58 pm

Web Title: people demands not to carry coronavirus patients dead bodies from residential area wardha jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग होणार शंभर खाटांचा
2 दीपिका, प्रियांकासहीत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार?; गृहमंत्र्यांनी केलं ‘हे’ वक्तव्य
3 “शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घाईगर्दीत घेऊ नये”
Just Now!
X