येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयात जागतिक मधुमेह दिनाच्या पाश्र्वभूमीवर मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि एचएएल स्कूल अ‍ॅल्युमनी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ‘आरोग्यम् धनसंपदा’ कार्यक्रमास नाशिककरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी आदी उपस्थित होते. आरोग्यासाठी चालणे या कार्यक्रमानंतर योगपीठ ट्रस्टचे योगाचार्य गोकुळ घुगे यांनी योगविद्येचे महत्त्व समजावून सांगितले. राजेश गिरमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अ‍ॅरोबिक्सची प्रात्यक्षिके केली. डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी मधुमेह होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, त्याविषयी, तर आहारतज्ज्ञ डॉ. अंजली मुखर्जी यांनी आहार नियंत्रणाचे महत्त्व सांगितले. रांगोळी, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. धर्माधिकारी, जोशी, पवार यांसह शरद आहेर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धेत सचिन पटेल, पोस्टर स्पर्धेत प्रिती कुलथे, तर घोषवाक्य स्पर्धेत प्रतिभा पाळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या वेळी अभिनेते मोहन जोशी यांची मुलाखत घेण्यात आली. मोफत रक्तशर्करा तपासणीही झाली.