भिज पावसाने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याने खरीप पेरणी झाली. ६० टक्के पेरणीचे काम पूर्णत्वाला जाते न जाते तोच पावसाने डोळे वटारल्यामुळे सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात दीड महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. सतत तीन-चार दिवस भिज पाऊस झाल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, मात्र पावसाने ताण दिल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. सिरसम, फाळेगाव, आडगाव, एकांबा, वडद, कानडखेडा या भागातील शेतकऱ्यांनी आर्थिक मदत करावी, असे निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
 २ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्यानंतर पावसाने पुन्हा डोळे वटारले आहेत. ढग जमतात, पण पाऊस पडत नाही. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट आहे.

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
rain Mumbai,
मुंबईसह ठाण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?