येथील बाजार समितीच्यावतीने कापूस खरेदीची अंतिम तारीख ५ मेपर्यंत देण्यात आली होती. मात्र कापसाची आवक वाढू लागल्याने बाजार समितीने कापूस खरेदीची मुदत १२ मेपर्यंत तर खुराणा जिनिंगच्या वतीने २५ मेपर्यंत मुदत वाढविल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे.
बाजार समितीच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे शेतकरीवर्ग वैतागला आहे. हळद व कापूस खरेदीच्या निमित्ताने घडलेला प्रकार व शेतकऱ्यांनी धारण केलेले रौद्र रूप पाहून बाजार समितीला शेतकऱ्यांच्या वैतागलेल्या रुपाची दखल घ्यावीच लागल्याने ही मुदतवाढ मिळाली आहे. शेतकऱ्यांनी शनिवारी बाजार समितीच्या कार्यालयात खुच्र्याची मोडतोड केली होती. कारण लिलावानंतरही वजनकाटय़ाला विलंब होत होता. कापसाच्या भावातील चढउतार लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस आणला नव्हता. मात्र, शनिवारी ४ हजार ८०० ते ५ हजार रुपयांपर्यंत भाव वधारल्याने बाजार समितीच्या मैदानात ५०० टेम्पो कापसाचे आले होते. त्यामुळे शनिवारी गोंधळ उडाला.