12 July 2020

News Flash

सातारा जिल्ह्यात उद्यापासून मद्यविक्रीस परवानगी

मद्यविक्री दुकानांना परवानगी दिल्याबद्दल महिला, सामजिक कार्यकर्ते यांच्यातून नाराजी व्यक्त

मद्य विक्रीची दुकाने केवळ घरपोच सेवेस परवानगी असेल. (संग्रहित)

सातारा जिल्ह्यात उद्या (दि. १३)पासून मद्यविक्रीस परवानगी मिळाली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची प्रतच मद्यप्रेमींनी काही क्षणात मोठ्या उत्साहात दुकानांच्या यादीसह समाज माध्यमात फिरवली.

करोनाची प्रदुर्भावाची बिकट परिस्थिती उद्भवल्याने जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. राज्यात सर्वत्र मद्य विक्री दुकाने सुरु झाली तरी सातारा जिल्ह्यात ही दुकाने सुरु झाली नव्हती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव कमी असणाऱ्या क्षेत्रातील ४६ दारूची दुकाने सुरू कारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विशिष्ट अंतर ठेवून विक्री करण्यासाठी मद्य विक्रेत्या दुकानदारांनी आजपासूनच तयारी सुरू केल्याचे चित्र दिसत होते.

तर दुसरीकडे करोना प्रादुर्भाव वाढत असताना  जिल्हयात मद्यविक्री दुकानांना सुरु  करण्यास परवानगी दिल्याबद्दल नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक गावातून मद्याची बाटली हद्दपार झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दि.२३ मार्चपासून बंद करण्यात आलेली मद्याची दुकाने सुरू करू नयेत अशी मागणी होत होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूलााचे कारण पुढे करत काही नियम व अटींवर जिल्ह्यातील ४६ दारूच्या दुकानांना परवानगी दिल्याचा आदेश काढले आहेत.

विशेष म्हणजे हा आदेश जिल्हाप्रशासनाने जाहीर करण्याआधीच वाऱ्यासारखा समाज माध्यमांवर फिरत होता. सकाळी दहा पासून सायंकाळी सहा पर्यंत ही दुकाने काही नियम व अटीवर सुरू राहणार आहेत. त्या अटीचे उल्लंघन झाल्यास केवळ दोन महिने परवाना निलंबित करणायत येणार आहे. मद्यविक्री दुकानांना परवानगी दिल्याबद्दल महिला, सामजिक कार्यकर्ते यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा १२१ कडे गेला आहे. मद्यविक्री दुकाने बंद असल्याने थोडी तरी लगाम बसला आहे. मात्र, आज सकाळपासून समाज माध्यमांवर जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने उद्यापासून सुरू होणार, जिल्हाधिकारी यांची सही झाली अशी चर्चा रंगू लागताच सोशल मीडियावर टिप्पणी सुरू झाली आहे. अनेक मद्य विक्रि सुरु होत नसल्याने या विक्रेत्यांनी राजकीय आश्रय घेऊन प्रशासनावर दबाव आणल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 9:51 pm

Web Title: permission for sale of liquor in satara district from tomorrow msr 87
Next Stories
1 पालघर : एक गाव, एक वाण पद्धतीने भात लागवड
2 महाराष्ट्रात १०२६ नवे करोना रुग्ण ५३ मृत्यू, संख्या २४ हजार ४०० च्या पुढे
3 कोल्हापूर : गावी जाण्यासाठी परप्रांतीय कामगारांचा रास्ता रोको
Just Now!
X