21 September 2020

News Flash

दारुच्या नशेत बायकोला पेटवले; आई आणि मुलाला ठेचून मारले

अनुरथला दारूचे प्रचंड व्यसन होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे गुरूवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. येथील कोरफळे परिसरात राहणाऱ्या अनुराथ बरडे या इसमाने आपल्या आई, पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या केली. अनुराथ बरडे याला दारूचे व्यसन असून त्याच नशेत त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज पहाटेच्या सुमारास अनुराथ बरडे याने त्याची आई सखुबाई बरडे आणि मुलगा सुदर्शन बरडे यांना दगडाने ठेचून मारले. त्यानंतर अनुराथने त्याची पत्नी रेश्मा बरडे हिलाही पेटवून दिले. पत्नीला पेटवून दिल्यानंतर अनुराथने स्वत:च्या चार वर्षांच्या मुलीवरही वार करून तिला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी अडवल्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र, या मुलीची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अनुरथला ताब्यात घेतले आहे. अनुरथला दारूचे प्रचंड व्यसन होते. याच नशेत त्याने कुटुंबाला संपविल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. रात्री जेवणखान करून बरडे कुटुंबीय झोपी गेले होते. परंतु पहाटे अचानकपणे अनुरथ याने झोपेत असलेल्या आई सखुबाई (वय ६५) आणि थोरला मुलगा सुदर्शन (वय १३) यांच्या डोक्यावर दगड फोडायचा लोखंडी घन मारला. यात दोघेही आजी व नातू जागीच मरण पावले. तर घरात आतील बाजूच्या खोलीत झोपलेल्या पत्नी रेशमा (वय ३३) हिच्याकडे अनुरथ याने मोर्चा वळविला आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. याचवेळी गोंधळामुळे झोपेतून जागे झालेली मुलगी प्रतीक्षा (वय ११) व धाकटा मुलगा अविनाश (वय ९) यांच्यावर अनुरथ याने सुरीने हल्ला केला. दरम्यान, गंभीर भाजलेल्या पत्नी रेशमा हिचा घरातच मृत्यू झाला. तर सुरीहल्ल्यात जखमी झालेली दोन्ही मुले घरातच तडफडत राहिली. तर माथेफिरू अनुरथ हा या संपूर्ण घटनेनंतर सकाळी सहापर्यंत घराच्या दरवाजावर बसून राहिला. जेव्हा शेजारच्या मंडळींना या घटनेची कुणकूण लागली, तेव्हा पोलिसांना माहिती कळविण्यात आली. वैराग पोलिसांनी तातडीने कोरफळे येथे धाव घेऊन पाहणी केली असता हा धक्कादायक प्रकार आढळून आला. अनुरथ यास अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 10:39 am

Web Title: person killed his mother son and wife murder case solapur maharashtra
Next Stories
1 भाजपच्या आयात उमेदवारांमुळे काँग्रेसला आव्हान
2 सुवर्णभोजनाच्या ताटानंतर आता काँग्रेसचा हवाई थाट!
3 वर्षभरात रस्ते अपघातात ३०१ जणांचा मृत्यू
Just Now!
X