News Flash

हे काय वित्त नियोजन आहे का?; जयंत पाटलांचा निर्मला सीतारामन यांना सवाल

"केंद्रीय अर्थमंत्रालय वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करतंय"

जयंत पाटील यांनी निर्मला सीतारामन यांना टोला लगावला. (संग्रहित छायाचित्र)

पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या गुलालाची उधळण होताच पेट्रोल-डिझेलच्या दराच्या झळा सर्वसामान्यांना बसू लागल्या आहे. निवडणुकीच्या निकालापासून देशात दररोज इंधनांची दरवाढ होत असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करू लागले आहेत. राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाच लक्ष्य केलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरावर भूमिका मांडत ‘हे काय वित्त नियोजन आहे का?’, असा सवाल पाटील यांनी सीतारामन यांना केला आहे.

देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. महाराष्ट्रातही इंधन दरवाढ होत आहे. परभणीत देशातील सर्वात महागड्या दराने म्हणजे पेट्रोल प्रतिलिटर १००.७५ पैसे तसेच डिझेलही प्रतिलिटर ९०.६८ रुपये दराने विक्री होत आहे. तर मुंबईतही पेट्रोलचे दर ९८.३६ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ८९.७५ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. या वाढत्या दरावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल केला आहे.

“निवडणुका आल्या की पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले जातात आणि निवडणुका गेल्या की, दरवाढ ही ठरलेलीच; हे काय वित्त नियोजन आहे का? केंद्रीय अर्थमंत्रालय वेगळ्याच दर्जाचे वित्त नियोजन करत आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रकाश टाकायला हवा,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे आजचे दर (प्रतिलिटर। रुपयांमध्ये)

मुंबई पेट्रोल – ९८.३६ , डिझेल – ८९.७५

पुणे पेट्रोल – ९८.०६, डिझेल – ८८.०८

नागपूर पेट्रोल -९७.७५, [डिझेल -८७.९८

नवी मुंबई पेट्रोल -९८.५६, डिझेल – ८९.९४

नाशिक पेट्रोल – ९८.७६, डिझेल – ८८.७६

औरंगाबाद पेट्रोल- ९९.६०, डिझेल – ९०.९९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:48 pm

Web Title: petrol diesel price hike news jayant patil slams finance minister nirmala sitharaman petrol diesel rates hike bmh 90
Next Stories
1 “ राज्यातील माध्यमांमधील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा!”
2 “अग्रलेखांचा बादशाह माहिती होते, हे तर कोलांटउड्यांचे बादशाह निघाले”
3 “शरद पवारसाहेब तुम्ही दारुवाल्यांसाठी पत्र लिहिलं, शेतकऱ्यांसाठीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा ना”
Just Now!
X