पुणेकरांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. कारण पुण्यातल्या पेट्रोलच्या दराने आता शंभरचा आकडा पार केला आहे. फक्त पेट्रोलच नाही तर सीएनजी आणि डिझेलचे दरही कमालीचे वाढले आहेत. हा आकडा शंभरी पार करुन गेला असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

करोनाने हैराण झालेले पुणेकर पेट्रोल दरवाढीच्या नव्या संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे आणि आज तर पेट्रोल थेट १००.१५ रुपयांवर पोहोचलं आहे. पुणे शहरातले इंधनाचे दर(प्रतिलीटर) खालीलप्रमाणेः

  • पेट्रोल- १००.१५ रुपये
  • पॉवर पेट्रोल- १०३.८३ रुपये
  • डिझेल-९०.७१ रुपये
  • सीएनजी- ५५.५० रुपये

मे महिन्यात आतापर्यंत १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. परंतु कपात एकदाही झालेली नाही. एप्रिलमध्ये अधून-मधून कपात केली गेली. ज्यामुळे पेट्रोल ७७ पैसे आणि डिझेल ७४ पैसे स्वस्त झाले. पण ४ मेनंतर पुन्हा किंमती वाढण्यास सुरवात झाली आणि मे महिन्यात पेट्रोल ३.५९ रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर या महिन्यात डिझेलमध्ये प्रतिलिटर ४.१३ रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

आणखी वाचा- नागरिक हैराण! आज पुन्हा झाली पेट्रोल दरवाढ, जाणून घ्या दर

आपल्या शहरातले इंधनाचे दर कसे जाणून घ्याल? 

देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.