News Flash

कबुतरांचा सांभाळ करत सांगलीचा पठ्ठ्या कमावतोय लाखो रुपये!

देशभरात आणि राज्यात कबुतरांची स्पर्धा भरवण्यात येते.

आधुनिक काळात संदेशवहनाची माध्यमे बदलली आहेत. मात्र, फार पूर्वीपासून पत्रव्यवहारासाठी कबुतर या पक्ष्याचा उपयोग केला जायचा हे सर्वज्ञात आहे. पूर्वी संदेशवहनासाठी वापरण्यात येणारे हे कबुतर आज जगभरात मोठय़ा प्रमाणात पाळले जातात. आपल्या खास वैशिष्टय़ांमुळे कबुतरांनी पक्षीप्रेमींच्या मनावर छाप टाकली आहे. सांगली जिल्ह्यातील सिकंदर मुल्ला हा पठ्ठ्या परिवाराचा व्यावसाय जोपासत आहे. सिकंदरला कबुतरांनी लाखो रूपये मिळवून दिले आहेत. त्याच्या या कबुतरांचा डंका दिल्लीपर्यंत गेला पोहचला आहे.

मिरजमधील नांद्रे येथे राहणारे हाजी सिकंदर मुल्ला यांना कबूतर पाळण्याचा छंद त्यांचे वडील चांद मुल्ला यांच्यामुळे लागला. त्यांची चौथी पिढी सुरज व शकील मुल्ला हे देखील कबूतरांची जपणूक करत आहेत. मुल्ला कुटुंबीयांकडे सध्या साठ ते सत्तर कबुतरे आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विविध स्पर्धेमध्ये मुल्ला यांना कबुतरांनी साडे पाच लाखाचे बक्षीस मिळवून दिले आहे.

देशभरात आणि राज्यात कबुतरांची स्पर्धा भरवण्यात येते. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातील कबुतरानं बाजी मारली आहे. त्यामधूनच मुल्ला यांना लाखो रूपये मिळालेत. सर्वात उंच उडण्याचा आणि जास्तवेळ आकाशात राहण्याचा विक्रम मुल्ला यांच्या कबुतरांनी करून दाखवला.

सहा प्रकारची पाखरे
सध्या हाजी मुल्ला त्यांची दोन मुले सुरज व शकील हे कबुतरांना सांभाळत आहेत. सध्या त्यांच्याकडे कोईमतुर, देशी, खडक, लकी, मद्राशी अशी सहा प्रकारची पाखरे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 12:12 pm

Web Title: pigeon keeping hobby mulla family nandre sangli nck 90
Next Stories
1 WhatsApp कॉलिंग करणाऱ्यांसाठी खुशखबर, आलं नवं फीचर ; पण…
2 ७२ साल बाद : १९४७ मध्ये हरवलेले बहिण-भाऊ भेटले व्हॉट्सअपमुळे
3 64MP चा शानदार कॅमेरा, Redmi Note 8 Pro चा आज फ्लॅशसेल
Just Now!
X