News Flash

चंद्रपुरात एकाच आठवड्यात १०० डुकरांचा मृत्यू झाल्याने खळबळ

पशु वैद्यकीय अधिकारी घेत आहेत कारणांचा शोध

प्रातिनिधिक

रवींद्र जुनारकर
मागील एक आठवड्यात चंद्रपूर शहरात १०० च्या जवळपास डुकरांचा मृत्यू झालेला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या तीन झोनमध्ये मृत पावलेली डुकरे उचलण्यासाठी आलेल्या तक्रारीच्या आधारावर ही माहिती मिळालेली आहे. दरम्यान डुकरांच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असले तरी लोकांमध्ये भिती आहे.

वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना मागील एक आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात घराजवळ डुकर मृत झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. अचानक मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यामुळे देशमुख यांनी मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तेव्हा एकट्या वडगाव प्रभागात आठवड्याभरात ३५ ते ४० डुक्कर मरण पावल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर त्यांनी मनपाच्या तीनही झोन मधून माहिती घेतली असता सुमारे १०० डुकरांचा एका आठवड्यात मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. एका आठवड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डुकरांचा मृत्यू होणे सामान्य बाब नाही.

डुकर मारण्यासाठी विषारी औषध देणे किंवा डुकरांमध्ये साथीचा आजार असणे अशी कारणे यामागे असू शकतात. डुकरांमध्ये साथीचा आजार पसरणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक होऊ शकते. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता डुकरांचे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूच्या कारणांची तज्ञ पशुवैद्यकीय वैद्यकीय चिकित्सक यांचेकडून शहानिशा करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक देशमुख यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते व उपायुक्त विशाल वाघ यांना पत्र देऊन केलेली आहे.

“डुकरांच्या मृत्यूची नेमकी संख्या सांगता येणार नाही, मात्र आठवडाभरात डुकरांचे मृत्यू झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कारणांचा शोध घेण्यासाठी डुकराचा मृतदेह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपविला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.” असं चंद्रपूर महानगरपालिका उपायुक्त विशाल वाघ यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 8:41 am

Web Title: pigs found dead in chandrapur sgy 87
Next Stories
1 डॉ शितल आमटेंचा मोबाइल, लॅपटॉप व टॅब उघडण्यात अपयश; डोळे पासवर्ड असल्याने अधिकाऱ्यांची कसरत
2 सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी: शिवसेनेचा भाजपाला इशारा
3 स्थानक परिसरात दुचाकींचे विद्रूपीकरण
Just Now!
X