News Flash

‘त्या’ चिमुकल्याचा गाडीत गुदमरून मृत्यू की हत्या? वडिलांनी व्यक्त केला संशय

मुलाच्या शरीरावर जखमा आहेत

पुण्यातील चाकण येथे कारमध्ये गुदमरून पाच वर्षांच्या चिमुकल्याची मृत्यू झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली होती. करण पांडे असे या चिमुकल्याचे नाव असून खेळता खेळता तो घराजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये जाऊन बसला होता. पण या प्रकरणी करणच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

वडील अखिलेश पांडे यांनी मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत त्यामुळे संशय बळावत असल्याचं सांगितलं. माझ्या मुलाची हत्या करून त्याला नंतर गाडीत आणलं असण्याची शक्यता आहे असं वडील म्हणाले. जर तो स्वतःहून गाडीत जाऊन बसला होता, तर त्याच्या शरीरावर जखमा कशा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

पाहा काय म्हणाले वडील –

चाकण येथे राहणारा करण पांडे हा मुलगा सोमवारी दुपारी त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर खेळत होता. दुपारी बाराच्या सुमारास तो खेळता खेळता उन्हात उभी असलेल्या इस्टिम गाडीत बसला. याच दरम्यान कार लॉक झाली आणि तो कारमध्ये अडकला. काचा बंद असल्याने त्याचा गुदमरुन मृत्यू झाला, असं प्राथमिक वृत्त होतं पण आता त्याच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 2:20 pm

Web Title: pimpari chinchwad five years old child dies after being locked inside the car or its a murder father questions
Next Stories
1 भीमा कोरेगाव हिंसाचार : मिलिंद एकबोटेंना दुसऱ्या गुन्ह्यात ४ दिवसांची पोलीस कोठडी
2 अंगावर पत्नीचे फोटो चिटकवून पतीची आत्महत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना
3 संत्र्यांना पुन्हा उच्चांकी भाव!
Just Now!
X