News Flash

देहूरोडमध्ये टोळक्याचा धुडगूस; वाहनांची तोडफोड, २ महिलांनाही मारहाण

देहूरोड परिसरात काही गुंडांनी दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड करत दोन महिलांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री...

देहूरोड परिसरात काही गुंडांनी दहशत माजविण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड करत दोन महिलांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसात विजय प्रीतम मंगवाणी यांनी तक्रार दिली आहे. परंतु अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक ८ ते ९ दुचाकीवर आलेल्या तोमल हिरमिटकर,शाबीर शेख त्याचा भाऊ,अक्षय म्हेत्रे,विजय तेलगू,आफताब शेख,राहुल अलकुंटे,शकीब शेख,यांसह आणखी सात जणांनी देहूरोड बाजार,पारशी चाळ, बापदेव नगर,किवळे येथे हातात हॉकी स्टिक,लोखंडी कोयते,लाकडी दांडके घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पारशी चाळ येथील तीन दुचाकी आणि तीन चारचाकी गाड्याची तोडफोड करत नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पारशी चाळ मधील एका ६५ वर्षीय महिलेला मारहाण केली आहे.त्याचबरोबर बापदेव येथील दीपाली सायकर यांना पायावर आणि हातावर लाकडी दांडक्याने मारहाण केल्याच समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. येथील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. पोलीस हे घटनेनंतर फार उशिरा येत असल्याची तक्रार केली आहे. अद्याप कोणाही अटक करण्यात आलेली नाही. अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 10:40 am

Web Title: pimpari chinchwad mob creates ruckus in dehuroad women also beaten
Next Stories
1 घराणेशाहीतील लोकांना जवळ करूनच भाजप सत्तेवर
2 नाटकाचा शस्त्र म्हणून वापर करा – नाना पाटेकर
3 महोत्सवाच्या नावाखाली पदपथांवर अतिक्रमण
Just Now!
X