News Flash

पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षा झाल्या दहावी पास

१७ नंबरचा फॉर्म भरून दिली होती परीक्षा

पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड दहावीची परीक्षा उतीर्ण झाल्या आहेत. २६ वर्षांच्या ममता गायकवाड विवाहित आहेत. लग्नापूर्वी त्यांनी ममता पवार या नावाने परीक्षा दिली होती. त्यांना ५५ टक्के गुण मिळाले. स्थायी समितीचा कारभार सांभाळताना उपयोगी पडणाऱ्या गणितमध्ये मात्र त्यांना ५९ गुण मिळाले आहेत.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत महिला आरक्षण पडल्याने,पती माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पत्नीला पहिल्यांदाच रिंगणात उतरवलं.त्या बहुमतानी निवडून आल्या.विनायक गायकवाड यांनी स्थायीच्या खुर्चीवर बसण्याचा चंग बांधला होता.पण पत्नीचे शिक्षण आठवीच्या पुढे न झाल्याने, त्यांनी १७ नंबर फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेचं वेळापत्रक आले अन दरम्यान मार्च महिन्यात स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू झाली.

यात पक्षाने ममता गायकवाड यांचे नाव पुढे केले,सभापती म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आले.स्थायीच्या चाव्या त्यांच्या हातात आल्या.आणि त्याच वेळेत परीक्षा देखील झाली.परीक्षेत त्यांना पंचावन्न टक्के गुण मिळाले मात्र,जीव भांड्यात पडला. ममता गायकवाड यांना मराठीत ३८,हिंदी मध्ये ३९ गुण मिळाले आहेत.परंतु स्थायी समितीचे गणित हाताळणाऱ्या अध्यक्षा ममता गायकवाड यांना ५९ गुण मिळाल्याने त्या समाधानी असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 6:32 pm

Web Title: pimpri chinchwad standing committee chairman 10th pass
Next Stories
1 दहावीत पास झालेल्या मुलासाठी मिठाई आणायला गेलेल्या महिलेवर गोळीबार
2 आजीने भंगार विकून नातवाला शिकवले; पिंपरीच्या तुषारला दहावीत ७० टक्के
3 Maharashtra SSC 10th Result 2018 : रुग्णालयातून दहावीची परीक्षा दिली!
Just Now!
X